

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावर रविवार 30 नोव्हेंबर, रोजी मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार रेल्वे स्थानकात दरम्यान अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत म्हणजेच तब्बल 5 तास मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येण्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10 वाजून 48 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 45 मिनिटांपर्यंत डाऊन धीम्या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकल रेल्वे सेवांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार रेल्वे स्थानकात दरम्यान जलद रेल्वे मार्गावर वळवण्यात येतील तसेच या रेल्वे सेवांना फक्त भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शिव आणि कुर्ला या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येईल. आणि पुढे विद्याविहार रेल्वे स्थानकावर डाऊन धीम्या रेल्वे मार्गावर वळवल्या जातील.
तसेच धीम्या अपमार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकल रेल्वे सेवांना व घाटकोपर येथून सकाळी 10 वाजून 19 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 52 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या दिम्या मार्गावरील लोकल रेल्वे सेवांना विद्याविहार रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अफजलद मार्गावर वळवल्या जातील आणि हा लोकल रेल्वे सेवांना कुर्ला, शिव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येईल.
हार्बर आणि ट्रान्सफरमार्गावर देखील ब्लॉक
त्याचप्रमाणे हार्बर रेल्वे मार्गावर आणि देखील पनवेल ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 11 वाजून 5 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 5 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉग दरम्यान ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकातून सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत अप मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकल सेवांना आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहुन सकाळी 9 वाजून 45 मिनिटांपर्यंत बेलापूर आणि पनवेल रेल्वे स्थानकाकडे प्रवास करणाऱ्या लोकल रेल्वे सेवांना रद्द करण्यात येईल.