Thane Crime : शिवसेना शिंदे गटाच्या चौघांचा जामीन न्यायालयाने नाकारला

डोंबिवली पूर्वेतील नाटेकर हल्ला प्रकरण
Shinde Sena Leaders Bail Rejected
शिवसेना शिंदे गटाच्या चौघांचा जामीन न्यायालयाने नाकारलाPudhari File Photo
Published on
Updated on

कल्याण : डोंबिवली पूर्वेतील भाजप पदाधिकारी ओमनाथ नाटेकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील शिवसेना शिंदे गटाच्या दोघा माजी नगरसेवकासह त्यांच्या दोन मुलांचा जामीन अर्ज शनिवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारीत पोलिसांनी कलम का बदलले, असा सवाल उपस्थित करीत चौघांचा जामीन नाकारल्याने या चौघांचा आधारवाडी कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

महापालिका निवडणूकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होते. त्याच्या आदल्या दिवशी पैसे वाटपावरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात जोरदार राडा झाला होता. भाजपचे नाटेकर हे जखमी झाले होते.

Shinde Sena Leaders Bail Rejected
Rajya Sabha Elections : धैर्यशील पाटलांना पुन्हा संधी मिळणार का?

या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवि पाटील यांच्यासह त्यांच्या दोन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी नितीन पाटील आणि रवि पाटील यांना अटक केली. त्या दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल केले होते. न्यायालयीन कोठडी मिळालेली असताना दोघांवर उपचार सुरु होते.

2 फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना 3 फेब्रुवारी रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले. मात्र 3 फेब्रुवारी रोजी जेव्हा या दोघांसह त्यांच्या दोन मुलांना न्यायालयासमोर हजर केले गेले. पोलिसांनी लावलेल्या कलमात बदल का केला, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता.

आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर 7 फेब्रुवारी सुनावणी घेण्यात आली. मात्र कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्यासमोर आरोपीचे वकिल उमर काजी यांनी युक्तीवाद केला. त्यांची बाजू ठामपणे मांडली. कशा प्रकारे आमची लोक गुन्हेगार नाही. प्रतिष्ठीत आहेत. गुन्हयाचे स्वरुप तसे नव्हते. त्यांना न्यायालयाने जामीन द्यावा, अशी मागणी केली.

Shinde Sena Leaders Bail Rejected
Thane Crime : शहापूरात वनक्षेत्रात गावठी दारूच्या भट्ट्यांची चलती

न्यायालायने आरोपींच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेत पोलिसांनी कशाच्या आधारे कलमात बदल केला? इतकेच नाही तर मेडिकल आणि एक्सरे रिपोर्ट का दिला नाही? हा मुद्दा उपस्थित करीत चारही जणांना जामीन नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news