

ठाणे ः अनुपमा गुंडे
कफ सिरपमुळे 20 बालकांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही अन्न, औषध प्रशासनाचा कारभार संथ गतीने सुरू आहे. प्रिस्क्रीप्शनशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या मेडीकलच्या तपासणीसाठी औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ नसल्याने 555 मेडिकल्सची तपासणी करणे शक्य झाले आहे. त्यापैकी 235 मेडिकल्सना प्रिस्क्रीप्शनशिवाय कफ सिरपची विक्री केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
कोल्ड्रिफ कफ या सिरपमध्ये मूत्रपिंडाला हानी पोहोचवणारे डायथिलीन ग्लायकॉल हे विषारी रसायन आढळले आहे. त्यामुळे या सिरपची विक्री थांबवण्याचे आदेश राज्याच्या औषध प्रशासनाने दिले आहेत. अनेक ग्राहकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन औषधे घेण्याची सवय आहे. त्यामुळे बालकांच्या जीवावर उठणाऱ्या कफ सिरपची विक्री थांबविण्यासाठी औषध प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली.
प्रिस्क्रीप्शनशिवाय हे सिरप विकणाऱ्या मेडिकल्सचा परवाना रद्द करण्यापर्यंतचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र 15- 20 दिवसात औषध प्रशासनाला 1 लाख दुकानांपाकी 555 मेडिकल्सची तपासणी करणे शक्य झाले,या तपासणीत विना प्रिस्क्रीप्शन कफ सिरपची विक्री करणाऱ्या 225 दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.