Sanitation workers protest | कचरा संकलनाच्या खासगी ठेकेदार कंपनी विरोधात कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन

केडीएमसी मुख्यालय समोर ठिय्या आंदोलन, काम बंद आंदोलन पुकारले
 कल्याण डोंबिवली
कचरा संकलनाच्या खासगी ठेकेदार कंपनी विरोधात कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलनPudhari photo
Published on: 
Updated on: 

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतील कचरा संकलनाचा खाजगी ठेकेदार सुमित एल्को प्लास्ट कंपनी विरोधात कंत्राटी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. शुल्लक कारणावरून अचानकपणे ५६ कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले. कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात व कामगाराच्या विविध मागण्यांकरीता श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आंदालन केले. कंत्राटी कामगारांनी महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या मारत काम बंद आंदोलन पुकारले.

केडीएमसी क्षेत्रातील कचरा संकलनाचा कामाचा कोट्यवधी रुपयांचा ठेका सुमित एल्को प्लास्ट कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीने खासगी कामगारांकडून कचरा संकलनाचे काम केले जाते. या कंपनीने काम करणाऱ्या ५६ खासगी कामगारांना कामावर दांड्या मारल्याच्या शुल्लक कारणावरून अचानक त्यांना कामावरून काढून टाकल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली. या खासगी ठेकेदारांच्या कामगारांनी श्रमजीवी संघटनेच्या राज्य सचिव जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

संघटनेच्या शिष्टमंडळाने पालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे मागण्याचे निवेदन सादर करीत मागण्या संदर्भात चर्चा केली. पालिका प्रशासनानेही शिष्टमंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी जयश्री पाटील यांनी सांगितले की, सुमित एल्को प्लास्ट कंपनीने ५६ कामगारांना काढून टाकल्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली. कामावरून कमी केलेल्या कामगारांना त्वरित कामावर घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रशासनासोबत सविस्तर बैठक येत्या २ नोव्हेंबरला होणार आहे. त्याचबरोबर कचरा कामगारांना कचरा उचलल्यावर फोटो काढण्यासाठी सक्ती केली जाते. त्यासाठी कंत्राटदार कंपनीने कामगारांना मोबाईल त्यासाठी लागणारा रिचार्ज दिलेला नाही. त्यामुळे ही सक्ती करणे योग्य नाही याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

त्याचबरोबर कामगारांचे वेतन दर महिन्याच्या सात तारखेला दिले जावे. कंत्राटी कामगारांना पाच लाखाच्या आरोग्य विम्याचे कवच द्यावे. कामगारांची ऑनलाईन हजेरी बंद करण्यात यावी. विविध कंत्राटी कामगारांची थकीत वेतनाची रक्कम तात्काळ देण्यात यावी. साप्ताहिक सुट्टी ही भरपगारी देण्यात यावी. वैद्यकीय रजा भरून मिळावी. कामावर असताना अचानक तब्येत बिघडली किंवा कोणती इजा झाली असल्यास कोणतीही कपात करू नये. तो दिवसही कामगाराला पूर्ण भरून मिळावा. दिवाळी सणानिमित्त ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान देण्यात यावे, या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 कल्याण डोंबिवली
Mira Bhayandar news: मिरा-भाईंदर महासभेत गोंधळ; नगरसेवकांवरील तक्रारीनंतर पालिकेचे पोलिसांना पत्र

दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी श्रमजीवी संघटनेचा संविधान मोर्चा भिवंडी ते मुंबई असा काढण्यात येणार आहे. राज्य विम्यातील वेतन पात्रता मर्यादा २१ ते ३० हजार रुपये प्रति महिना करण्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावा. राज्यातील सर्व महानगरपालिकेमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात भरीव वाढ करून समान वेतन धोरण लागू करण्यात यावे.

सर्व महापालिकेमध्ये सलग ५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कामगारांना महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी विशेष धोरणात्मक निर्णय घ्यावा. शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत सफाई कामगार रुग्ण सेवा व वैद्यकीय सेवा देणारे कंत्राटी कामगार तसेच १०२ रुग्णवाहिका चालक यांना शासनाच्या कायम सेवेत सामावून घ्यावे. कंत्राटदार बदल्यामुळे जुन्या आणि अनुभवी कंत्राटी कामगारांना कामावरून कमी न करता त्यांच्या रोजगाराचे आणि सेवा हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत मागण्या करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 कल्याण डोंबिवली
Mira Bhayandar news: मिरा-भाईंदर महासभेत गोंधळ; नगरसेवकांवरील तक्रारीनंतर पालिकेचे पोलिसांना पत्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news