

ठाणे : घोडबंदर रोडवर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून अपघातांच्या मालिकेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे तातडीने खड्डे बुजवून वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची मुक्तता करण्यासाठी शुक्रवार (दि.27) रोजी ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने आनंदनगर नाक्यावर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून निवेदन स्वीकारले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, राजन राजे यांनी आंदोलनस्थळी भेट देउन पाठिंबा जाहीर केला.
घोडबंद रोड हा खड्डे मुक्त करण्याचा सरकार आणि महापालिकेची घोषणा ही कागदावर राहिली आहे. मोठ्या प्रमाणावर ती खड्डे रस्त्यांवर पडल्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते तसेच उड्डाणपूलांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता अधिक निर्माण झालेले आहे. वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता ठाणे शहर काँग्रेसने आज आनंदनगर नाका येथे आंदोलन छेडले यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ठाण्यातील मेट्रोच्या कामाची मेट्रोच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली. यावेळी राजेश जाधव, राहुल पिंगळे,महिला अध्यक्ष स्मिता वैती, रवी कोळी, निशिकांत कोळी, हिंदुराव गळवे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत.