Chitrapataka Marathi Film Festival: 15 ते 18 नोव्हेंबर मराठी चित्रपट महोत्सव

महोत्सवातून मिळणारा महसूल दुष्काळ निवारणासाठी देणार
Marathi movies theater shows
Marathi moviespudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे: सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Marathi movies theater shows
Kharpada toll plaza: खारपाडा टोलनाक्यावर राडा; कर्मचारी आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये हाणामारी; ट्रॅव्हल्स बसची तोडफोड

याप्रसंगी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महोत्सवाचे संचालक व ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभाग व महामंडळाचे संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी संबोधित करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, यंदाच्या महोत्सवात एकूण ४१ मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यामध्ये पाच जुन्या अभिजात मराठी चित्रपटांचा समावेश असेल.

Marathi movies theater shows
Taloja firing incident: तळोजात लिफ्ट कंत्राटावरून गोळीबार; दोघे गंभीर

उर्वरित ३६ चित्रपटांमध्ये नवीन, विविध चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजलेले, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेले, प्रयोगशील तसेच अप्रदर्शित चित्रपटांचा समावेश असल्याचे शेलार यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी प्रास्ताविकात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव ही संकल्पना आकारास आल्याचे नमूद केले.

ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेडेकर हे यंदाच्या महोत्सवाचे संचालक, तर सिनेअभ्यासक-दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे हे क्युरेटर आहेत.

यंदाच्या महोत्सवात पुस्तक ते सिनेमा’ (बुक टू स्क्रीन) हा उपक्रम. मराठीतील उत्तम कथाविषय असलेल्या आणि चित्रपटाच्या माध्यमात रूपांतरित होण्याची क्षमता असलेल्या पुस्तकांचे लेखक व प्रकाशक यांना चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार आणि निर्मिती संस्थांशी संवाद साधण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या आयोजनातून मिळणारा महसूल दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे. कोणताही डामडौल न करता महोत्सवाच्या चारही दिवसांसाठी नोंदणी शुल्क प्रतिव्यक्ती १०० रुपये ठेवण्यात आले आहे. या नोंदणी शुल्कातून जमा होणारा महसूल दुष्काळ निवारणाच्या कार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात आहे.

याशिवाय, दुष्काळग्रस्तांसाठी अतिरिक्त योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘डोनर पास’ अर्थात ‘सामाजिक कृतज्ञता प्रवेशिका’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

विविध कार्यक्रमांची पर्वणी

मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर परिसंवादांमध्ये चर्चा होईल. चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय योगदान दिलेल्या चित्रकर्मींच्या मुलाखतींतून त्यांचे अनुभव, विचार आणि कार्यप्रवास उलगडण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news