Electric Shock:विजेच्या झटक्याने 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला.
Electric Shock
Electric ShockPudhari
Published on
Updated on

ठाणे: वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात सोमवारी रात्री विजेच्या झटक्याने समर शेख (6) याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरातील रहिवासी आक्रमक झाले. त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला.

इंदिरानगर भागातील रुपादेवी पाडा परिसरातील एका चाळीमध्ये समर त्याच्या कुटुंबासोबत एकमजली घरात राहत होता. सोमवारी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास घराबाहेरील लोखंडी जिन्याजवळ वाळत टाकलेली गोधडी काढण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला विजेचा झटका बसला. या घटनेनंतर त्याच्या पालकांनी तात्काळ त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

Electric Shock
Rain Indicator Flower: पालघर जिल्ह्यात पावसाचे संकेत देणारा बहावा बहरतोय

परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर संतापलेल्या रहिवाशांनी, भागातील नगरसेवक अमित सरैय्या यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे समर याचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Electric Shock
Dangerous Hoardings: उड्डाण पुलावरील शुभेच्छा फलक ठरतायेत धोकादायक

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणाची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांनी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. इंदिरानगर भागात अनेक ठिकाणी महावितरण कंपनीच्या तारा घरांजवळ लोंबकळत्या अवस्थेत आहेत. त्यामुळे आणखी एखादी गंभीर घटना घडण्याची भिती नागरिक व्यक्त करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news