

ठळक मुद्दे
अंबरनाथ येथील चिखलोली धरणात पुन्हा एकदा रसायनयुक्त पाणी सोडल्याचा प्रकार
जांभिवली, ठाकूरपाडा येथील रासायनिक कंपनीतून पाणी थेट धरणात
अंबरनाथ पूर्व येथील सुमारे 50 रहिवाशांच्या घराघरात दुर्गंधीयुक्त पाणी पोहोचत आहे
अंबरनाथ (ठाणे) : शहराच्या पूर्व भागातील तब्बल पन्नास हजार पेक्षा जास्त लोकवस्ती ला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणामध्ये येथील आनंदनगर एमआयडीसी मधील केमिकल कंपन्यांचे केमिकल वेस्ट थेट धरणामध्ये सोडले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असतानाही आपल्या डोळ्यावर झापड लावलेल्या यंत्रणेला याचे काहीच सोयर सुतक नसल्याने सर्व सामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
चिखलोली धरणालागत असलेल्या एका रासायनिक कंपनीतील केमिकल वेस्ट थेट धरणात सोडलेजात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इतकेच नाही तर धरणांतील मासे देखील मृत अवस्थेत पडल्याने हे मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत.
लघुपाठ बंधारे विभागाचे नियम धाब्यावर बसवत धरण क्षेत्रापर्यंत अतिक्रमण आणि काही कंपन्यांनी आपली हद्द वाढवली आहे. त्यामुळे अनेक रासायनिक कंपन्यांकडून धरणात रसायनाच्या गोण्या टाकणे, रसायनयुक्त पाणी सोडण्याचे जीवघेणे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. हे कमीवकी काय पुन्हा एकदा चिखलोली धरणाला लागून असलेल्या जांभिवली, ठाकूरपाडा येथील एका रासायनिक कंपनीतून रासायनिक वेस्ट सोडले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी जयंत हजारे यांनी सांगितले की, 'धरणाच्या पाण्याची आणि परिसराची पाहणी करून नमुने घेण्यात आले आहेत. त्यानुसार अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषी कंपण्याविरोधात कारवाई करण्यात येईल'. असे सांगितले.