

Chandgad MLA Shivaji Patil Honey Trap :
चंदगड: आमदार शिवाजी पाटील यांना अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी चंदगड पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. पवन पवार (वय २५) असे या तरुणाचे नाव असून, तो चंदगड येथील रहिवासी आहे. या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी आता ठाणे पोलीस चंदगडला जाण्याची शक्यता आहे. आमदार शिवाजी पाटील हे चंदगड विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
गेल्या वर्षभरापासून आमदार शिवाजी पाटील यांना अज्ञात व्यक्तींकडून अश्लील मेसेज, व्हिडिओ आणि वारंवार व्हिडिओ कॉल्स येत होते. पाटील यांनी अनेकवेळा त्या नंबरला ब्लॉक केले, तरी दुसऱ्या नंबरवरून मेसेज पाठवले जात होते. अखेरीस, त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
याबाबत बोलताना शिवाजी पाटील म्हणाले, 'ते मला व्हिडिओ WhatsApp कॉल करायचे फोटो पाठवायचे. मी तो नंबर ब्लॉक केला. मात्र ते दुसऱ्या नंबरने परत अश्लील फोटो पाठवायचे, व्हिडिओ कॉल करायचे. मी परत ब्लॉक केलं. असं वारंवार एक दोनवेळा घडलं. त्यानंतर मी मी समोरच्या व्यक्तीना सांगितलं बाबा मी पोलीस कमप्लीट करतोय.'
'मी राहतो त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आता आरोपी पकडला गेल्यावर त्यांच्या चौकशीत यामागे काही राजकीय हेतू असेल तर किंवा त्या मागे कोण आहे हे स्पष्ट होईल.' असं वक्तव्य केलं होतं.
पोलिसांनी केलेल्या तपासानंतर, चंदगडमधून २५ वर्षीय पवन पवार याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो कोणत्या हेतूने हे मेसेज पाठवत होता, तसेच या प्रकरणामागे कोणताही राजकीय हेतू किंवा अन्य व्यक्तीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीच्या चौकशीनंतर या प्रकरणाची अधिक माहिती उघड होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.