परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कॅप्टन आशिष दामले यांची नियुक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांकडून कौतुक
Thane News
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कॅप्टन आशिष दामले यांची नियुक्ती Pudhari Photo
Published on
Updated on

बदलापूर : राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाची पहिले जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्यावर देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी कॅप्टन आशिष दामले यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचा सत्कार करून कौतुक केला.

Thane News
महिला आर्थिक विकास महामंडळांच्या 2 वरिष्ठ अधिकार्‍यांना लाचप्रकरणी अटक

ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना तसेच ब्राह्मण समाजातील होतकरू उद्योजकांना औद्योगिक व इतर क्षेत्रात राज्य शासनाकडून मदत व्हावी या हेतूने या महामंडळाची स्थापना राज्य शासनाने केली आहे. ब्राह्मण समाजाच्या विविध स्तरातून या मंडळाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करण्यात येत होता. कॅप्टन आशिष दामले हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असून त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रमुख पद भूषवला आहे. तसेच त्यांनी कुळगांव बदलापूर नगरपालिकेचे दोन वेळा उपनगराध्यक्षही होते. उच्चशिक्षित, सामाजिक जाण असलेल्या कॅप्टन आशिष दामले यांचे नियुक्ती बद्दल ब्राह्मण समाजातून त्यांच्यावर अभिनंदन आजचा होत आहे. आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधीच आशिष दामले यांची नियुक्ती झाली आहे.‌येत्या काळात मला मिळालेल्या जबाबदारीच मी चिज करून दाखवेल. समाजातील गरजू घटकांना या महामंडळाचा जास्तीत जास्त लाभ राज्य शासनाकडून कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले.

Thane News
रामोशी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कॅप्टन आशिष दामले हे वयाच्या अवघ्या 21 व वर्षी पहिल्यांदा अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अमेरिकेत कमर्शियल पायलटची नोकरी सोडून त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. आपल्या आई-वडिलांना कडून राजकीय वारसा पुढे नेत दामले यांनी बदलापूर शहरातच नव्हे, तर आजूबाजूलाही आपल्या सामाजिक शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. राज्यातील ताईज् किचनच्या माध्यमातून अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण देण्याचा उपक्रमाचे नंतर महाविकास आघाडी सरकार ने त्यांचा हे मॉडेल उचलून शिव भोजन योजना अंमलात आणली. ताईज् किचनच्या माध्यमातून बदलापुरात दररोज शेकडो नागरिकांना अवघ्या दहा रुपयात जेवण मिळते. तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्वात सुसज्ज आणि प्रशस्त असे ग्रंथालयाचे हे निर्मिती केली असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका व पुस्तके उपलब्ध होतात. महिलांसाठी आरोग्यविषयक योजना राबवून दामले यांनी राजकीय सामाजिक जीवनाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या ओळखीमुळेच त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news