Dombivli Accident | ब्रेक फेल बसचा थरार: डोंबिवली–अंबरनाथ महामार्गावर रिक्षाचा चक्काचूर

एनएमएमटी बस अपघाताने खळबळ, रिक्षाचालक गंभीर जखमी
Dombivli Ambarnath Highway Accident
बसच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला Pudhari
Published on
Updated on

Dombivli Ambarnath Highway Accident

नेवाळी : एमआयडीसीच्या डोंबिवली अंबरनाथ महामार्गावर खोणी फाटा चौकात नवी मुंबई महापालिका परिवहन (एनएमएमटी) सेवेच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला आहे. डोंबिवली पाईपलाईन मार्गावरील निसर्ग हॉटेलसमोर, महामार्गावरील खोणी फाटा चौकात भरधाव बस थेट समोर असलेल्या रिक्षावर आदळली आहे. जोरदार धडकेमुळे रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर नियंत्रण सुटलेल्या बसने पुढे जाऊन महावितरणच्या विजेच्या खांबाला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

एमआयडीसीच्या खोणी फाटा चौकात सकाळ सायंकाळ मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र बुधवारी दुपारच्या सुमारास अपघात झाल्याने मोठं दुर्घटना टळली आहे. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने हा महामार्ग कामगारांची वर्दळ असलेला असूनही मोठी जीवितहानी टळली,मात्र काही क्षणांचा उशीर झाला असता मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा घटनास्थळी होती.

Dombivli Ambarnath Highway Accident
Dawood Ibrahim : दाऊदचा हस्तक सुभाषसिंह ठाकूरला ठाणे न्यायालयात केले हजर

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होतु. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अपघातग्रस्त बस चालक व वाहक यांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशी सुरू आहे. बसच्या देखभाल-दुरुस्तीतील निष्काळजीपणा, ब्रेक यंत्रणेची वेळेवर तपासणी न होणे आणि प्रवासी वाहतूक सेवांवरील ढिसाळ नियंत्रण यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेतील बसांची तांत्रिक स्थिती, नियमित फिटनेस प्रमाणपत्र, ब्रेक सिस्टिमची तपासणी आणि चालक प्रशिक्षण याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news