Kalyan Politics : कल्याणात पक्ष प्रवेशावरून भाजप-शिवसेना शिंदे गटात पुन्हा वाद पेटणार

2 माजी नगरसेवकांची भाजपतून पुन्हा शिंदे गटात घरवापसीने पडली ठिणगी
Kalyan Politics
कल्याणात पक्ष प्रवेशावरून भाजप-शिवसेना शिंदे गटात पुन्हा वाद पेटणारPudhari News Network
Published on
Updated on

कल्याण : एकेमकांचे पक्ष फोडाफोडीवरून शिवसेना शिंदे गट व भाजपामध्ये तापलेले वातावरण वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यावरून शांत झाले होते, मात्र जस जशा निवडणूक नजीक येऊ लागल्या तशतशा भाजपा शिवसेना शिंदे गट पक्षातील एकमेकां मधील शह काटशहचे राजकीय नाट्याला पुन्हा सुरुवात झाली आहे. नुकत्याच एक दीड महिन्या पूर्वी भाजपात पक्षात प्रवेश केलेल्या केडीएमसीतील दोघा माजी नगरसेवकाने यू टर्न मारीत भाजपची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याने भाजपा पक्षातील वातावरण अधिकच तापले आहे.

Kalyan Politics
Maharashtra politics : मुंबईत भाजपाला, ठाण्यात शिंदेंना झुकते माप

काही आठवड्यांपूर्वी एकमेकांचे पक्ष फोडण्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसेना आणि भाजपमधील वातावरण चांगलेच तापले होते. ज्याचे पडसाद थेट दिल्लीमध्येही उमटलेले दिसून आले. त्यानंतर मग दोन्ही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आल्यानंतर हे ताणले गेलेले संबंध निवळले होते. मात्र हा शमलेला वाद आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील वरिष्ठ माजी नगरसेवक अरुण गीध आणि त्यांच्या भगिनी माजी नगरसेविका वंदना गीध शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशा बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहितीही दिली आहे. मात्र गीध बंधू - भगिनींच्या या शिवसेना पक्षप्रवेशा नंतर भाजपाकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेच्या या दुहेरी भूमिकेबाबत विरोध व्यक्त केला आहे.

Kalyan Politics
Maharashtra politics : भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news