BJP demand KDMC standing committee : केडीएमसीच्या स्थायी समितीसाठी भाजप आग्रही

शिंदे सेनेची सामंजस्याची भूमिका तरीही पदांसाठीची रस्सीखेच सुरूच
BJP demand KDMC standing committee
केडीएमसीच्या स्थायी समितीसाठी भाजप आग्रहीpudhari photo
Published on
Updated on

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती पद भाजपला मिळावे यावर भाजप आग्रही आहे. महायुतीच्या वाटाघाटीत हे पद भाजपला मिळेल असा दावा भाजपने केला असला तरी यावर शिंदे सेनेची सामंजस्याची भूमिका आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापती पद कोणाच्या वाटाला जाणार याचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेणार आहेत.

महापालिकेच्या निवडणूका पार पडल्यावर निकाल जाहीर झाला. निकालानंतर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. मात्र महासभा घेतली जात नसल्याच्या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटासह भाजप आक्रमक झाली होती. अखेर 16 मार्च रोजी महासभा घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहिर करण्यात आले.

BJP demand KDMC standing committee
lpg crisis impact on apmc market: हॉटेल बंदचा फटका; नवी मुंबई एपीएमसीत रोजचा 100 ते 120 गाडी भाजीपाला पडून, दर गडगडले

या महासभेत महापालिकेतील पक्षीय बलाबलाच्या आधारे तौलनिक संख्याबळ पाहता स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती आणि शिक्षण समितीत सदस्यांची निवड केली जाणार आहे. सदस्य निवडणूकीची प्रक्रिया पार पडल्यावर स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहिर केली जाणार आहे. 16 मार्च नंतर लगेच स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेतली जाणार आहे.

महापौर पद शिंदे सेनेकडे आहे. तर उपमहापौर पद भाजपकडे आहे. ही दोन्ही पदे शिंदेसेना आणि भाजपच्या वाटयाला आली असली तरी भाजपने आत्ता स्थायी समिती सभापती पद आणि सभागृह नेते पदावर दावा ठोकला आहे. स्थायी समिती ही महापालिकेची तिजोरी असते. या तिजोरीच्या चाव्या भाजपला आपल्या हाती ठेवायच्या आहे. त्यामुळे भाजपने स्थायी समिती सभापती पदासाठी आग्रह धरला आहे.

BJP demand KDMC standing committee
Azad Maidan protest wrestlers : दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा शासनाने भरवावी

शिंदेसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे यांनी सांगितले की, भाजपने स्थायी समिती सभापती पदाची मागणी मागणी केली असली तरी दोन्ही पक्षाचे नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. त्याचबरोबर भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मागणी केली आहे की, स्थायी समिती सभापती पद आणि सभागृह नेते पद भाजपला मिळावे. आम्ही निवडणूका युतीत लढलो. पद नाही मिळाले तर काय केले पाहिजे? असा विषयच नाही. महायुतीच्या वाटाघाटीत भाजपला हे पद मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news