

भिवंडी : भावाने त्याची सख्खी बहीण प्रियकराने पळवून नेल्याच्या रागातून प्रियकराच्या मावस भावाला चाकूने भोसकून त्याला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह मित्रांच्या दिशेने चाकू फिरवून दहशत पसरवल्याची घटना अंजूर फाटा येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोर भावाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला आहे.
गणेश शिंदे (25) असे फरार हल्लेखोराचे नाव आहे. तर लक्ष्मण नारायण मंडल (27) असे चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मावस भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश हा अंजूर फाटा परिसरात राहतो. तर जखमी हा नारपोली हद्दीत राहत असून गणेशची बहीण काही दिवसांपूर्वी पळून गेल्याच्या राग धरून गणेशने 5 ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास अंजूर फाटा येथील जिम समोर मित्रांसोबत गप्पा मारत करत असतानाच लक्ष्मणला शिवीगाळ करून हाताच्या चापटीने मारहाण करण्यासह जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू लक्ष्मणच्या पोटात खुपसून त्यास गंभीर जखमी केले आहे. तर लक्ष्मणला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रांनाही गणेशने चाकू दाखवत परिसरात दहशत निर्माण केली आहे.
याप्रकरणी जखमी लक्ष्मणच्या फिर्यादीवरून गणेशच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांची कुणकुण लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.: एका मित्राने दुसर्या मित्राला शिवी देवून आवाज देवून बोलावल्याने त्याचा जाब मित्राने विचारल्याच्या रागातून शिवीगाळ करून आवाज देणार्या मित्राने जाब विचारणार्या मित्राला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना नारपोली परिसरातून समोर आली आहे.