Thane Crime : महामार्गावर नाकाबंदीमध्ये गोवंश मांस जप्त

टेम्पो व कारसह तीनजणांना घेतले ताब्यात
Cow Meat Seized
महामार्गावर नाकाबंदीमध्ये गोवंश मांस जप्तpudhari photo
Published on
Updated on

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे खिंड येथे भिवंडी तालुका पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाईत एक टेम्पो व एका कार मधील एक टन गोवंश मांस जप्त करण्यात आले असून तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई नाशिक महामार्गा वरून काही वाहनांमधून गोवंश जातीचे मांस तस्करी केली जाणार असल्याची माहिती भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर पोलिस पथकातील संतोष बाबु गिरी, वाठारकर, दांडकर हे पहाटेच्या सुमारास नाकाबंदी वर तैनात असताना साडेसहा वाजताच्या सुमारास संशयित बोलेरो टेंपो व कार या भरधाव वेगात नाशिक बाजुकडून वडपे खिंडीत, मुंबई बाजुकडे येतांना दिसली. त्या गाडीला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.

Cow Meat Seized
Parbhani Crime | पूर्णा येथे वकिलाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ४५ लाखांच्या खंडणीप्रकरणी तिघे जेरबंद

त्यामुळे महिंद्रा टेंपो रस्त्याच्या बाजुला असलेल्या दगडाला जाऊन धडकल्याने टेम्पो थांबला. त्याच वेळी सोबत येणारी फोर्ड कार चालकाने देखील पोलिसांच्या अंगावर भरधाव वेगाने गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कार टेम्पोला जाऊन धडकली. यावेळी नाकाबंदी वर असणारे पोलिस हवालदार संतोष गिरी किरकोळ जखमी झाले.

त्यावेळी नाकाबंदी वर तैनात असणारे पोउपनिरी निंबाळकर व पोलिस पथकाने टेम्पो व कार चालक यांना चपळाईने पकडत दोन्ही गाड्यांची तपासणी केली असता टेम्पो मध्ये ताडपत्रीत संपुर्ण गोमांस भरलेले दिसले. तर कारच्या डिक्कीमध्ये प्लॅस्टिक पिशवीमध्ये गोमांस भरलेले दिसले. या दोन्ही वाहनांमध्ये ३ लाख रुपये किमतीचे एक टन ३० किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी टेम्पो चालक कलीम अन्सारी व मोसिन शेख व साथीदार जुनेद मुनाफ कुरेशी दोघे या तिघांना ताब्यात घेतले.

Cow Meat Seized
Dombivli Crime: डोंबिवलीत खुनाला अडीच वर्षांनी फुटली वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news