Bhiwandi Police CCTV Footage Case: सीसीटीव्ही फुटेज परस्पर केले डिलीट; पोलीस अधिकाऱ्यांचा पोलिसाविरोधात गुन्हा

भोईवाडा पोलीस ठाण्यातील पाच हार्ड डिस्कमधील महत्त्वाचे फुटेज परस्पर डिलीट केल्याचा आरोप; पोलीस शिपाई आणि तंत्रज्ञाविरोधात कारवाई.
CCTV
CCTVPudhari
Published on: 
Updated on: 

भिवंडी: शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्यातील शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील महत्त्वाचे फुटेज परस्पर डिलीट करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांच्या तक्रारीवरून पोलीस शिपाई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश चंद्रभान नागरे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपाईचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती- नुसार परिसरातील सराईत गुन्हेगार म्हणून पोलीस ठाण्यात नोंद असलेला अख्तरअली याच्या विरोधात महिला तक्रार देण्यासाठी आली होती.

CCTV
Arecanut leaf spot disease: हवामान बदलामुळे सुपारीच्या पिकांवर ठिपक्यांच्या रोगाचे संकट; बागायतदारांनी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन

त्यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई उमेश नागरे याने पदाचा गैरवापर करून आरोपी विरुद्ध कारवाई न करण्याच्या बदल्यात त्याला पोलीस ठाणेतून पळून जाण्यास मदत केली.

या प्रकरणी तक्रारदार महिलेने पोलीस उमेश नागरे याने आपणास न्याय मिळवून दिला नाही, अशा आशयाचा तक्रारी अर्ज पोलीस आयुक्तालय ठाणे येथील ग्रीव्हन्स सेलकडे केला होता, आरोपीने पाच हार्ड डिस्कमधील सुरक्षित असलेले सीसीटीव्ही चित्रीकरण फुटेज डिलीट केले होते.

CCTV
Thane Bhiwandi Metro 5: ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचे श्रेय प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांचे: कपिल पाटील

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज किमान १२ ते १८ महिने सुरक्षित ठेवणे बंधनकारक असताना, ज्याचा उपयोग महत्त्वाच्या गुन्ह्याच्या तपासा कामे उपलब्ध करून देता येऊ शकतो, हे माहीत असतानाही पोलीस शिपाईने त्याच्या पदाचा गैरवापर करून आरोपीकडून आर्थिक व्यवहार करून आरोपीच्या कार्यात मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस शिपाई व त्याला मदत करणारा तंत्रज्ञ अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.