Bhiwandi Municipal Budget: 15 मिनिटांत अर्थसंकल्पीय सभा तहकूब; भिवंडी महापालिकेचा 1179 कोटींचा अर्थसंकल्प सादर

दुर्बल घटकांसाठी 5% तरतूद, पाणीपुरवठा व शिक्षणावर मोठा खर्च; 30 मार्चला सविस्तर चर्चा
Bhiwandi Municipal Budget
Bhiwandi Municipal BudgetPudhari
Published on
Updated on

भिवंडी : संजय भोईर

भिवंडी महानगरपालिकेचा 73 लाख 96 हजार शिल्लक दर्शविणारा 1,179 कोटी 10 लाख 97 हजार रुपयांचा 2026-2027 चा अर्थसंकल्प आयुक्त अनमोल सागर यांनी विशेष महासभेत महापौर नारायण चौधरी यांना सादर केला.

या विशेष सभेस उपमहापौर तारिक मोमिन, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, नयना ससाणे व्यासपीठावर उपस्थित होते. तर या विशेष महासभेस काही मोजके नगरसेवक उपस्थित होते.

Bhiwandi Municipal Budget
Mumbai Sea Pollution: समुद्रात सांडपाणी सोडल्याने किनाऱ्यावरील प्रदूषण वाढले; जलचरांवर गंभीर संकट

आयुक्तांनी सविस्तर अर्थसंकल्पाचे सविस्तर वाचन न करता ठळक तरतुदींचा उल्लेख असलेली प्रस्तावना वाचन केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये या अर्थसंकल्पीय विशेष सभेचे सूप वाजून सभा तहकूब करण्यात आली. 30 मार्च रोजी या अर्थसंकल्पावर विशेष चर्चा करण्यासाठी महासभा आयोजित करण्यात येत असल्याचे महापौर नारायण चौधरी यांनी जाहीर केले.

आयुक्त अनमोल सागर यांनी यावेळी केलेल्या भाषणात 2025-26 चे सुधारित व 2026-27 मूळ अर्थसंकल्प मंजुरीकरिता सादर करीत असल्याचे स्पष्ट केली.

2025 - 2026 चे 1117 कोटी 52 लाख 54 हजाराचे सुधारित अर्थसंकल्प व सन 2026 - 2027 चे 73 लाख 96 हजार शिलकीचा 1179 कोटी 10 लाख 97 हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

Bhiwandi Municipal Budget
Mumbai Water Shortage: मुंबईतील पाणीटंचाई अजून दशकभर कायम? महापालिकेचा इशारा

30 मार्च रोजी अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा होणार - नारायण चौधरी

आयुक्तांकडून अर्थसंकल्प सादर केल्यानंतर बुधवारपासून महासभेत सलग चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याची घोषणा महापौर नारायण चौधरी यांनी केली. तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नव्यानेच लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून आले आहेत. त्यांच्या हाती अर्थसंकल्पाची प्रत मिळाल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा. नगरसेवकांच्या मनामध्ये शहर

विकासासंदर्भात काही संकल्पना आहेत, त्या सभागृहात मांडता याव्यात यासाठी किमान 4 दिवस वेळ मिळावा, अशी विनंती शिवसेना नगरसेवक मनोज काटेकर यांनी सभागृहाला केली. त्यास काँग्रेसचे प्रशांत लाड व भाजपचे सुमित पाटील यांनी पाठिंबा दर्शवत सभागृहास विनंती केल्यानंतर महापौर नारायण चौधरी यांनी 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विशेष महासभेचे आयोजन अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केल्याची घोषणा करीत अर्थसंकल्पावरील विशेष महासभा तहकूब करण्यात आली.

Bhiwandi Municipal Budget
Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिकेचा नवा आयुक्त कोण? चर्चांना उधाण

महिला बालकल्याण दुर्बल, दिव्यांगांसाठी 5 टक्के तरतूद

महिला व बालकल्याण, दुर्बल घटक कल्याण व दिव्यांग कल्याण या तीन विभागांसाठी मूळ अर्थसंकल्पातून महसुली उत्पन्नातून वाढीव खर्च वजा करून उर्वरित उत्पन्नाच्या 5 टक्के अर्थात 3 कोटी 26 लाख 40 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा उत्पन्न

कमी, खर्च अधिक

पाणी पुरवठा व मलनिस्सारण, शिक्षण विभाग, वृक्ष संवर्धन अर्थसंकल्पात उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्याने या खर्चासाठी अर्थसंकल्पातून पाणीपुरवठाकरिता 105 कोटी 14 लाख 91 हजार तर शिक्षण विभागासाठी 76 कोटी 11 लाख 26 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Bhiwandi Municipal Budget
Rohit Pawar Allegation: पक्षाच्या नियंत्रणासाठी काळी जादू... सुनेत्रा काकी राजकारण लय वंगाळ.. रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

पायाभूत सुविधांसाठी तरतूद

शहराचा सर्वांगीण विकास कामासाठी या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांतर्गत शहरातील विविध पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली असल्याचे आयुक्त अनमोल सागर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

32 जण गैरहजर

मागील तीन वर्षे प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच लोकप्रतिनिधी निवडून आले असून त्यांच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने मोठी उत्सुकता लागून राहिलेली असताना या विशेष महासभेस 58 नगरसेवक हजर राहिले तर तब्बल 32 जणांंनी दांडी मारली होती.

1) ए. पी. जे. कलाम शिक्षा अभियानासाठी - 1 कोटी

2) पी. एम. बस सेवा सुरू करण्यासाठी - 5 कोटी

3) जी आय सर्व्हेक्षणासाठी - 10 कोटी

4) शाळा दुरुस्तीसाठी - 4 कोटी

5) 100 एम एल टी - 25 कोटी

6) रस्ते रुंदीकरण कामासाठी - 2 कोटी\

Bhiwandi Municipal Budget
Mumbai Water Tax: मुंबईत पाणीपट्टी वाढ नाही : प्रशासनाचे स्पष्ट आश्वासन

पैसा येणार कसा?

विकास निधी - 19 कोटी 85 लाख

इतर उत्पन्न - 84 कोटी 63 लाख

मालमत्ता व पाणीपट्टी कर - 102 कोटी 96 लाख

जी एस टी अनुदान - 430 कोटी 68 लाख

भांडवली उत्पन्न - 299 कोटी 46 लाख

जाणार कसा?

पाणीपुरवठा - 192 कोटी 11 लाख

आस्थापना खर्च - 373 कोटी 74 लाख

बांधकाम - 113 कोटी 88 लाख

आरोग्य - 49 कोटी 85 लाख

इतर महसुली खर्च - 397 कोटी 50 लाख

विद्युत - 36 कोटी 22 लाख

वाहन - 7 कोटी 68 लाख

संगणक - 2 कोटी 56 लाख

अग्निशमन - 2 कोटी 91 लाख

उद्यान - 2 कोटी 20 लाख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news