Bhiwandi Accident : ट्रकच्या धडकेत वृद्धाचा चिरडून मृत्यू

अज्ञात चालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Accident
AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरून बाप-लेक दुचाकीने ठाण्याच्या दिशेने जात असताना दुचाकीला हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून वृद्धाचा चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी अज्ञात चालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अय्युब मेहबूब शेख (६७) असे मयत वडिलांचे नाव असून जावेद शेख असे जखमी मुलाचे नाव आहे.

Accident
Bhiwandi Crime : भिवंडीत खाटूश्याम मंदिरातील दागिने चोर महिलांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१३ नोव्हेंबर रोजी दुपारी पाऊणे एक वाजताच्या सुमारास जावेद आणि अय्युब हे दोघे मुंब्र्याहून मुंबई-नाशिक महामार्गाने ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची दुचाकी अंजूर गावच्या हद्दीत पोहोचली असता त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा हायवावरील चालकाने दुचाकीला जोरात धडक दिली.

या अपघातात अय्युब यांचा जागीच मृत्यू झाला. जावेद जखमी झाला असून त्याच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Accident
MHADA Mill Workers Housing : कोन, पनवेलमधील घरांच्या ताब्यासाठी १,०५१ विजेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.