Bhiwandi Gas Cylinder Seizure : भिवंडीत गॅस माफियावर एफडीएची टाच

७७२ घरगुती सिलेंडरांचा अवैध साठा जप्त
Bhiwandi Gas Cylinder Seizure
Bhiwandi Gas Cylinder Seizurepudhari photo
Published on
Updated on

भिवंडी : भिवंडीत अन्न व नागरी पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत गॅस माफियाच्या काळाबाजाराचा पर्दाफाश केला आहे. शहरालगतच्या खोणी गावातील मिठपाडा परिसरात एका गोदामावर टाकलेल्या धाडीत तब्बल ७७२ घरगुती गॅस सिलेंडरांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाख ८० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मानवी वस्तीत इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वलनशील सिलेंडर साठवून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतातही गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यासाठी साठेबाजी सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. खोणी ग्रामपंचायत हद्दीतील मिठपाडा येथील ‘श्री राम ट्रेडर्स’ या अन्नधान्य घाऊक विक्रीच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करण्यात आल्याची गोपनीय माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाचे कारवाई नियंत्रक चंद्रकांत डांगे यांना प्राप्त झाली होती.

Bhiwandi Gas Cylinder Seizure
Thane News: ठाणे महानगराला पोहोचतेय भीषण आगीची झळ

या माहितीची खातरजमा झाल्यानंतर उपनियंत्रक गणेश बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने छापा टाकला. छाप्यात गोदामातून एचपी गॅस, भारत गॅस आणि इंडेन कंपनीचे ५ किलो वजनाचे घरगुती वापराचे ६९२ भरलेले आणि ८० रिकामे असे एकूण ७७२ सिलेंडर आढळून आले.

एवढ्या मोठ्या प्रमाणातील साठ्यामुळे अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. प्राथमिक तपासात संबंधित गोदामधारकाकडे केवळ २० गॅस सिलेंडर साठविण्याचा परवाना असल्याचे उघड झाले. मात्र परवानगीच्या मर्यादेचे उल्लंघन करून शेकडो सिलेंडर गोदामात साठवण्यात आले होते.

Bhiwandi Gas Cylinder Seizure
Illegal gas sale: टेंभुर्णीत अवैधपणे गॅस सिलिंडरची विक्री

विशेष म्हणजे हा साठा दाट लोकवस्तीत करण्यात आल्याने दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानीची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अधिकाऱ्यांची संयुक्त मोहीम

सदर कारवाई उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी गौतम राऊत, रत्नदीप सावंत,अमोल गरकर,चेतन राजगडकर रविंद्र राठोड, राजीव भेले, विकास नागदिवे, राहुल इंगळे, अरुण काते, देवानंद थोरवे, राजेश सोरते आणि पवन कुंभले यांच्या संयुक्त पथकाने केली.

काळाबाजाराचा संशय; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरचा वापर काळाबाजार, अवैध विक्री अथवा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यासाठी केला जात होता का, याचा तपास सुरू आहे. संबंधितांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच गॅस साठवणुकीसंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news