

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क | भिवंडी येथील रहानाळ गावात प्लायवूड आणि कपड्यांचे साहित्य असलेल्या एका गोदामात शुक्रवारी (दि.25) रोजी भीषण आग लागली. ही घटना प्रेरणा कॉम्प्लेक्समध्ये दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कपड्यांचे गोदाम आणि निवासी क्षेत्र असलेल्या ठिकाणी ही आग लागली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पोहोचल्यानंतर चार ते पाच तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावच्या हद्दीत फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीत फर्निचरची 7 ते 8 गोदामे जळून खाक झाली आहे. फर्निचरची पूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणली आहे.