Bhiwandi Encroachment: भिवंडीत नगरसेवक-पालिका अधिकाऱ्यांतील शाब्दिक चकमक; वादानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई

चकमकीनंतर पालिकेकडून बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाइ
Bhiwandi Encroachment
Bhiwandi EncroachmentPudhari
Published on
Updated on

भिवंडी: भिवंडीत नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांमधील शाब्दिक चकमकीतील वादानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. भिवंडी महापालिका मुख्यालयात गुरुवारी बाजारपेठेतील मच्छी मटण मार्केट इमारत परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत नसल्याचा ठपका ठेवत महापालिका नगरसेवक फराज बाहुद्दीन व प्रभाग समिती क्रमांक पाचचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सईद चिवणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी फराज बाहुद्दीन यांनी भ्रष्टाचार करून कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला होता.

Bhiwandi Encroachment
Shrivardhan local news: दगडी कोळशाअभावी लोहार व्यवसायाला घरघर; श्रीवर्धन तालुक्यातील कारागिरांची संख्या घटली

त्यानंतर प्रभारी सहाय्यक आयुक्त सईद चिवणे त्यांचे बिट निरीक्षक हनुमान म्हात्रे यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा या मार्केट इमारती बाहेरील सर्व दुकानांवर जेसीबीच्या सहाय्याने येथील अतिक्रमण केलेल्या दुकानांवर कारवाई करीत येथील रस्ता मोकळा केला आहे. जुन्या मच्छी व मटण मार्केट इमारत खाली करण्यात भ्रष्टाचार करून चालढकलपणा करीत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान अतिक्रमण कारवाईनंतर ही कारवाई यापूर्वीच केली असती तर शाब्दिक चकमकीची वेळ आलीच नसती अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news