Bhiwandi Bike Accident: छत्रपती शिवरायांच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला; दिव्यातील दोन मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू

छत्रपती शिवरायांच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला; दिव्यातील दोन मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी दुचाकीने मित्रांसोबत गेलेल्या दिवा येथील दोन मित्रांचा दर्शन घेवून घरी परतताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास वेहळे रोड येथे घडली आहे. या घटनेने दिवा गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.आयुष विजय जाधव (19) व त्याचा मित्र ऋषिकेश राजेश जाधव (25) अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत. तर या अपघाताची नोंद नारपोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident
MSRTC CCTV Project: ‘लालपरी’ला डिजिटल कवच! 7035 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे एसटी प्रवास अधिक सुरक्षित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दोघेही ठाण्यातील दिवा आघासन येथे राहत असून मित्रांसोबत दुचाकीने रविवारी सायंकाळी मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाकरिता गेले होते.

Accident
MMRDA Budget 2026 Kalyan Metro: एमएमआरडीए अर्थसंकल्पात कल्याणसाठी ४,८९७ कोटींची तरतूद; मेट्रो-रिंगरोड प्रकल्पांना वेग

्दरम्यान ते घरी येत असताना त्यांची दुचाकी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वेहळे येथील खुशी एक्सेस वर्ल्ड या ठिकाणी आली असता स्पीड ब्रेकवरून दुचाकी घसरून दोघांचा तोल जाऊन ते त्या ठिकाणी विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या डंपर क्र. एमएच 05 डिके 3999 ला धडकल्याने त्यांचा अपघात झाला असून अतिरक्त स्त्रावाने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Accident
Maharashtra Gram Panchayat Election: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल; 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेला सुरुवात

त्यामुळे डंपर चालकाने विरुद्ध दिशेला डंपर उभा केल्यामुळे सदर अपघात घडला असल्याचे मयत आयुष आणि राजेश यांचा मित्र आदित्य विजय आधव (21) ह्याने फिर्यादीत नमूद केले असून याप्रकरणी डंपर चालकाच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात भान्यासं कलम 106 (1) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news