MMRDA Budget 2026 Kalyan Metro: एमएमआरडीए अर्थसंकल्पात कल्याणसाठी ४,८९७ कोटींची तरतूद; मेट्रो-रिंगरोड प्रकल्पांना वेग

एमएमआरडीए अर्थसंकल्पात कल्याणसाठी ४,८९७ कोटींची तरतूद; मेट्रो-रिंगरोड प्रकल्पांना वेग
ठाणे
मेट्रो Pudhari News Network
Published on
Updated on

कल्याण : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) 2026-27 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये एमएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या मेट्रो आणि रस्ते प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी तब्बल 4 हजार 897.19 कोटींची भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ठाणे
BMC Standing Committee: पालिकेच्या स्थायी समितीवर श्रद्धा जाधव; ठाकरेंकडून ‘तिजोरी’ची जबाबदारी सोपवली

यामध्ये मेट्रो - 5, आणि मेट्रो - 5 अ विस्तारीकरण, मेट्रो 12, मेट्रो 14, कल्याण शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल, कल्याण रिंग रोड, विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग, ऐरोली काटई फ्री वे ( टप्पा - 3 ) या प्रकल्पांचा समावेश आहे. या भरीव निधीच्या तरतुदीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एमएमआरडीए प्राधिकरणाचे आभार व्यक्त केले आहेत. यासोबतच रस्ते व उड्डाणपूल प्रकल्पांनाही मोठी चालना मिळणार आहे.

कल्याण-शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल, कल्याण रिंग रोड, विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग, ऐरोली काटई फ्री वे (टप्पा -3) या प्रकल्पांचा समावेश असून, या मार्गांमुळे शहरांतर्गत आणि आंतरशहरी वाहतुकीचे जाळे अधिक सक्षम होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच औद्योगिक आणि लॉजिस्टिक वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या सहकार्यामुळे कल्याण मतदारसंघातील महत्वाकांक्षी वाहतूक प्रश्न मार्गी लागत असून नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि जलद वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

ठाणे
BMC Standing Committee Chairman | स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा

नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल...

मेट्रो मार्गिकांचा विस्तार याला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. एमएमआरडीएने तरतूद केलेल्या या निधीतून मेट्रो जाळ्याचा विस्तार हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे. मेट्रो-5 तसेच मेट्रो-5अ विस्तारीकरण, मेट्रो-12 आणि मेट्रो-14 या महत्त्वाकांक्षी मार्गांच्या कामांना गती दिली जाणार आहे. या मेट्रो प्रकल्पांमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ थेट महानगरातील प्रमुख व्यावसायिक व निवासी पट्ट्यांशी जोडला जाणार असून, रोजच्या प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक प्रणालीला बळ मिळणार आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघ केवळ निवासी विस्ताराचा भाग न राहता नियोजित शहरी विकासाचे केंद्र म्हणून विकसित होईल. वाढत्या महानगर विस्तारात कल्याण लोकसभा परिसराला स्वतंत्र ओळख देणारा हा अर्थसंकल्प ठरणार असून, येत्या काळात येथील वाहतूक, उद्योग, गुंतवणूक आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल घडेल.

ठाणे
Rajya Sabha Election 2026 | राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले! राज्यातील ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान

या प्रकल्पांना भरीव निधीची तरतूद

मेट्रो - 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण)

1 हजार 309.30 कोटी

मेट्रो - 5 अ (विस्तारित) 183.35 कोटी

(दुर्गाडी ते उल्हासनगर)

मेट्रो - 12 (कल्याण ते तळोजा)

1 हजार 54.54 कोटी

ठाणे
Western Railway AC Local Increase: शिवजयंतीपासून मुंबईकरांना गारेगार दिलासा; पश्चिम रेल्वेच्या 12 एसी व 3 नव्या लोकलची भर

मेट्रो - 14 (कांजूरमार्ग-बदलापूर) 500 कोटी

कल्याण शिळफाटा जंक्शन

ते भिवंडी उड्डाणपूल

कल्याण रिंग रोड 600 कोटी

विठ्ठलवाडी ते कल्याण

अहिल्यानगर उन्नत मार्ग 200 कोटी

ऐरोली काटई फ्री वे ( टप्पा-3) 900 कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news