Bhiwandi Septic Tank Accident: सेप्टिक टँकने घेतला सहा वर्षीय चिमुकल्याचा बळी; भिवंडीतील हृदयद्रावक दुर्घटना

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Bhiwandi Septic Tank Accident
Bhiwandi Septic Tank AccidentPudhari
Published on
Updated on

भिवंडी: भिवंडी शहरातील फरीद बाग परिसरात इमारतीतील निष्काळजी पणामुळे एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याची घटना सोमवारी घडली असून ही घटना इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

फरीद बाग परिसरातील अल-फरीद या इमारतीच्या पार्किंग परिसरात मित्रांसोबत खेळत असताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने त्यात पडून सहा वर्षीय मोहम्मद अहमद मसूद याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Bhiwandi Septic Tank Accident
Fish Price Hike: मासळी टंचाईने खवय्ये हवालदील; खोल समुद्रातील मासेमारी बंद

या घटनेचा संपूर्ण प्रकार इमारतीच्या सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली होती. दुपारी वडील मसूद हे आपल्या मोठ्या मुलाला शाळेतून घरी घेऊन आले. त्यानंतर लहान मोहम्मद अहमद हा राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये इतर मुलांसोबत खेळण्यासाठी गेला.

खेळताना तो पार्किंगमधील सेप्टिक टँकवर ठेवलेल्या पत्र्याच्या झाकणावर उभा राहिला होता. मात्र हे झाकण आधीपासूनच खराब व कमकुवत जीर्ण अवस्थेत असल्याने अचानक आत कोसळले आणि मोहम्मद अहमद थेट सेप्टिक टँकमध्ये पडला. घटनेनंतर त्याच्या सोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरडा करत घरच्यांना माहिती दिली.

Bhiwandi Septic Tank Accident
Virar Alibag Corridor: विरार-अलिबाग काॅरिडाेरच्या पहिल्या टप्प्याला मान्यता

स्थानिक नागरिकांनी धाव घेत चिमुकल्याला बाहेर काढले आणि तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच निजामपूरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

शवविच्छेदना साठी मृतदेह इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, इमारतीच्या देखभाली कडे झालेल्या दुर्लक्षामुळे हा निष्पाप जीव गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या इमारतींमध्ये सुरक्षेच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news