Fish Price Hike: मासळी टंचाईने खवय्ये हवालदील; खोल समुद्रातील मासेमारी बंद

गोड्या पाण्यातील मासळीची प्रतीक्षा
Fish Price Hike
Fish Price HikePudhari
Published on
Updated on

सुधागड: जून महिना अर्धा संपत आला तरी अध्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी नदी नाळे तळाव आणि धरणे आटली असून दुसरीकडे एक जूनपासून समुद्रातील मासेमारी ही कायदेशीर रित्या बंद झाली आहे खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील अशा दोन्हीही प्रकारच्या माशांची तीव्र त्यांचाही निर्माण झाल्यामुळे बाजारात मासलीचे दर कडाडले आहेत.

Fish Price Hike
Rain Delay: खेळ मांडला देवा...! पावसासाठी शेतकऱ्यांचा टाहो!

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की एक जूनपासून खोल समुद्रातील मासेमारी बंद होते अशावेळी खवय्ये गोड्या पाण्यातील मासळीकडे वळतात, पावसाळा सुरू झाल्यावरती ही ठीक ठिकाणी वलगन लागते वलगन म्हणजे नदी तलाव खाडी येथील मासे अंडी देण्यासाठी शेतात पोहळात येतात आणि त्यांना पकडले जाते.

यंदा १५ जून उजळला तरी पाऊस न पडल्याने जलस्रोत आटले आहेत त्यामुळे दरवर्षी दिवसांत मुबलक मिळणारे मळे, शिवडा, कटला, अरल्या, वाम, कोळंबी, खवळ यासारखे गोड्या पाण्यातील मासे बाजारातून गायब झाले आहेत. बहुतांश माशांच्या पोटात अंडी स्थानिक भाषेत पेर किंवा गाभोळी असतात बाजारात आवक घटल्यामुळे उपलब्ध असलेल्या थोड्याफार गोड्या पाण्यातील माशांचे दर मागील वर्षाच्या तुलनेत प्रचंड वाढले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news