Bhayandar Police Raid: वेश्याव्यवसाय अड्ड्यावर छापा; महिला दलाल अटकेत, पीडितेची सुटका

भाईंदर पूर्व येथील नवघर गावात असलेल्या एका इमारतीमध्ये पैशांचे आमिष दाखवून बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालवला जात होता.
Police Raid
Police RaidPudhari
Published on
Updated on

मिरा रोड: भाईंदर पूर्व येथील नवघर गाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या अनैतिक वेश्याव्यवसाय अड्ड्यावर नवघर पोलिसांनी कारवाई करत छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका ५१ वर्षीय महिला दलाला अटक केली असून एका २९ वर्षीय पीडित महिलेची सुटका केली आहे.

भाईंदर पूर्व येथील नवघर गावात असलेल्या एका इमारतीमध्ये पैशांचे आमिष दाखवून बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालवला जात होता. आरोपी महिला प्रेमलता मिश्रा (वय ५१ ) ही मीरा रोड येथील एका २९ वर्षीय पीडित महिलेच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा उठवत होती.

Police Raid
Mahad Flood 2021: भय इथले संपत नाही, अस्मानी संकट कायम; महाड महाप्रलयाची पाच वर्षे पूर्ण

पीडितेची आर्थिक कोंडी ओळखून तिला पैशांचे आमिष दाखवून वेश्यागमनासाठी प्रवृत्त केले जात होते. आरोपी महिला स्वतः पुरुष गिऱ्हाईक शोधून, त्यांच्याकडून रक्कम ठरवून ती स्वीकारायची आणि स्वतःची रूम या कृत्यासाठी उपलब्ध करून द्यायची, अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत नवघर पोलिसांना माहिती मिळताच त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आरोपी महिला दलाल हिला रंगेहात पकडले, तर पीडित महिलेची सुटका केली.

Police Raid
Matheran News: ईको पॉईंट येथील ई-टॉयलेटची दयनीय अवस्था

या प्रकरणी आरोपी प्रेमलता मिश्रा विरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपी महिलेला रीतसर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक देशमुख या करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news