Matheran News: ईको पॉईंट येथील ई-टॉयलेटची दयनीय अवस्था

३९ लाखांचे ई-टॉयलेट ठरले 'शोपीस'; मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकांना दिलेल्या आश्वासनाचा विसर?
Matheran News
Matheran NewsPudahri
Published on
Updated on

आनंद सकपाळ

नेरळ: माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या हद्दीतील ईको पॉईंट परिसरातील बंद अवस्थेतील ई-टॉयलेट आणि त्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था आजही कायम असल्याने नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रश्नावर नगरसेवक सचिन दाभेकर यांनी वारंवार सूचना तसेच नगरपरिषदेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप समूहात आवाज उठविल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्ती व ई-टॉयलेट सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Matheran News
Raigad Dams Overflow: रायगडतील २२ लघु पाटबंधारे प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’; कोलाड पाटबंधारे विभागाची माहिती

प्रशासकीय राजवटीत पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुविधांसाठी सुमारे ३९ लाख रुपये खर्चून ईको पॉईंट परिसरात ई-टॉयलेट उभारण्यात आले. मात्र हे ई-टॉयलेट आजही बंद अवस्थेत असून त्याचा कोणालाही लाभ होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

ई-टॉयलेटकडे जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाला असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या मार्गावरून स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच पर्यटकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Matheran News
JNPA Container Transport Delay: जेएनपीए-सीएफएसमध्ये कंटेनर वाहतुकीला मोठा फटका; कोंडीसह खराब रस्त्यांमुळे ऑपरेशन्स विस्कळीत

अपघाताचा धोका वाढला असून जुन्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि नव्याने उभारलेले ई-टॉयलेटही बंद असल्याने मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र ईको पॉईंट परिसरात लघुशंकेसारख्या मूलभूत सुविधेचाही अभाव जाणवत असल्याने पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

स्थानिकांच्या मते, सार्वजनिक निधीतून उभारलेल्या सुविधा वापरातच नसतील तर त्या खर्चाचे औचित्य काय, असा प्रश्न निर्माण होतो. एका बाजूला रस्त्यासारख्या अत्यावश्यक कामांकडे दुर्लक्ष होत असताना दुसऱ्या बाजूला लाखो रुपयांची सुविधा बंद अवस्थेत पडून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news