ICU rat bite case : अधिक्षक सक्तीच्या रजेवर; डॉक्टर परिचारिका निलंबित

भाईंदर येथील शासकीय रुग्णालयातील वृद्ध रुग्णाचे हात उंदराने कुरतडल्याचे प्रकरण
ICU rat bite case
अधिक्षक सक्तीच्या रजेवर; डॉक्टर परिचारिका निलंबितFile Photo
Published on
Updated on

भाईंदर : भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या 89 वर्षीय रुग्णाचा हात उंदराने कुरतडल्यानंतर त्या रुग्णाचा काही तासांतच मृत्यू झाल्याची घटना 16 मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी आरोग्य सेवेचे मुंबई मंडळ उपसंचालक यांनी जोशी रुग्णालयाच्या अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविले असून घटनेवेळी आयसीयूमध्ये कर्तव्यावर असलेले डॉक्टर व कंत्राटी परिचारिका यांना सेवेतून निलंबित केले आहे.

भाईंदर पूर्वेला राहणाऱ्या सुहासिनी माठेकर या 89 वृद्ध रुग्णाला हृदयाचा विकार असल्याने त्यांच्यावर जोशी या शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 16 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आयसीयूमध्ये उंदीर शिरून त्याने सुहासिनी यांचा दावा हात कुरतडून तो रक्तबंबाळ केला. हातातून रक्त वाहून त्यांची बेडशीट रक्ताने भिजली तरी आयसीयूमध्ये कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना त्याचा थांगपत्ता लागला नाही.

ICU rat bite case
Maharashtra UPSC success rate‌ : ‘यूपीएससी‌’मध्ये महाराष्ट्रातील यशवंतांच्या टक्क्यात घट

सकाळी 6 वाजताच्या सुमारास सुहासिनी यांचा मुलगा त्यांना पाहण्यासाठी आयसीयूमध्ये आला असता त्याला सुहासिनी यांचा हात उंदीर कुरतडताना दिसला. त्यांनी त्याला हटकल्यानंतर उंदीर पळून गेला. घटनेची माहिती सुहासिनी यांच्या मुलाने आयसीयूमधील कर्मचाऱ्यांना दिली. या घटनेची व्हीडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर घडलेला प्रकार चव्हाट्यावर आला.

घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालय अधिक्षक डॉ. जाफर तडवी यांनी आयसीयूमध्ये घटनेवेळी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून वरीष्ठांना त्याचा अहवाल पाठवून त्यांच्या स्तरावर कारवाई करण्याची विनंती केली.

त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यांनी त्याचा अहवाल आरोग्य सेवेचे मुंबई मंडळ उपसंचालक डॉ. अशोक नागपूरकर यांना कार्यवाहीस्तव पाठविला. डॉ. नागपूरकर यांनी घटनेची गंभीर दखल घेत जोशी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. जाफर तडवी यांना 15 दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठविले तर आयसीयूमधील डॉ. शंतनू कुंडगीर व कंत्राटी परिचारिका नमिता भोनर यांना सेवेतून निलंबित केले.

ICU rat bite case
Mumbai cost of living : रोजच्या जगण्याचा खर्च मुंबई-दिल्लीत सर्वाधिक
  • रुग्णालयाचा तात्पुरता कार्यभार डॉ. स्मिता आडे यांच्याकडे सोपविण्यात आला असून घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. घटनेनंतर काही तासांतच त्या वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याने जोशी रुग्णालयातील या अनागोंदी कारभाराविरोधात शहरातील राजकीय पक्ष आक्रमक झाले असून सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news