Thane Garba Death : भाईंदरमध्ये गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

नवरात्रोत्सवात दुर्दैवी घटना
Thane Garba Death
Thane Garba Deathpudhari photo
Published on: 
Updated on: 

मिरा रोड : नवरात्रोत्सवाचा आनंद सुरू असताना भाईंदरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. भाईंदर पश्चिमेला आयोजित गरबा-दांडिया खेळत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ३० वर्षीय तरुणाचा जागीच कोसळून मृत्यू झाला. मीत रुपडा असे मयत तरुणाचे नाव आहे.

भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली, पूनम अपार्टमेंट येथे मीत आपल्या आई-वडिलांसह राहत होता. तो रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या 'इस्ट वेस्ट फाउंडेशन'द्वारे आयोजित लोटस नवरात्रोत्सवात तो गरबा खेळण्यासाठी गेला होता. गरबा आणि दांडिया खेळत असताना अचानक त्याच्या छातीत असह्य वेदना सुरू झाल्या आणि तो क्षणात जमिनीवर कोसळला.

Thane Garba Death
Pune Flower Market Navratri: पुण्याच्या फुलबाजारात नवरात्रोत्सवात ८.८३ कोटींची उलाढाल; झेंडूच्या फुलांची सर्वाधिक आवक

उपस्थित नागरिकांनी व आयोजकांनी त्याला तातडीने उपचारासाठी भाईंदर येथील तुंगा रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मीतचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनलकर यांनी दिली आहे.

दरम्यान, मीतची प्रकृती उत्तम होती आणि त्याला पूर्वी कोणताही आजार अथवा आरोग्याची तक्रार नव्हती, तरीही अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे, अशी भावना त्याचा मित्र द्रुमिन रुपडा यांनी व्यक्त केली. या दुर्देवी घटनेमुळे रुपडा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Thane Garba Death
Tiger Shroff Firing Case : एस. व्‍ही. रोड, विले-पार्ले, अंधेरी मार्गे बोरिवलीहून कॅबने गाठले सुरत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news