सावधान! आता 5-जीच्या नावाने फसवणूक

5G Services
5G Services

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : केवायसी, वीजबिलांच्या नावाने नागरिकांची फसवणूक करणार्‍या भामट्यांनी आता 5-जीच्या नावाने ऑनलाईन लुटण्यासाठी जाळे पसरवल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. 4-जी सीम कार्ड बंद होणार आहे, इंटरनेट सुविधा सुरू ठेवायची असल्याचा एसएमएसद्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून 5-जी सुविधा मिळवा, असे सांगून नागरिकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे पूर्वी बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून नागरिकांना केवायसी, डेबिट, के्रडीट कार्ड बंद होण्याची भीती दाखवून बँकेचे खाते ऑनलाईन रिकामी करत आहे. असाच काहीसा फंडा वापरून 5-जी सुविधेच्या नावाने पैसे लुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील व्यवहार आता स्मार्ट फोनवर सहज करतात येतात. याचाच फायदा भामटे घेत असून त्यांनी लुटण्याचा ट्रेंड बदलला आहे. इंटरनेटवर लुटण्यासाठी बोगस वेबसाईटचे जाळे पसरवले आहे. त्यामुळे इंटरनेट वापरताना सतर्क राहणे गरजे आहे, असे आवाहन ठाण्याच्या सायबर सेलचे पोलीस निरीक्षक नीलम वाव्हळ यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news