Barvi Dam Water Cut: बारवी धरणातील पाणीसाठा घटल्याने दहा टक्के पाणीकपात; कार्यकारी अभियंता यांची माहिती

कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगरला फटका बसणार
Barvi Dam Water Cut
Barvi Dam Water CutPudhari
Published on: 
Updated on: 

बजरंग वाळुंज

डोंबिवली: बारवी धरणातील पाणीसाठा घटल्याने पाणी टंचाईचा फटका कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगरला बसणार असून दहा टक्के पाणीकपात करण्‍यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरकरांसाठी सूचना पाहता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी जाहीर केली आहे.

Barvi Dam Water Cut
Thane Crime News: ठाणे तेच... पण बदलतात गुन्हेगारीचे मोहरे

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने ५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशांनुसार यावर्षी पाऊस कमी झाल्याने, एल निनोचा प्रभाव आणि मान्सून लवकर माघारी गेल्यामुळे तसेच पुढील वर्षीही पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करणे गरजेचे आहे.

नियोजनासाठी शासनाने १० टक्के पाणीकपात करण्याचे ठरवले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी दिली. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा १५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

Barvi Dam Water Cut
October Heat in Raigad: रायगड जिल्‍हयात ऑक्टोबर हिटचा तडाखा!

तसेच त्यापुढील गुरुवारी २२ ऑक्टोबर पासून दर आठवड्याला गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून ते शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ३६ तासांची पाणीकपात करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी कळवले आहे.

या कालावधीत डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका व परिसरातील इतर ग्रामपंचायतींना होणारा पाणी पुरवठा बंद राहील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

तसेच पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने सर्व औद्योगिक व घरगुती ग्राहकांनी पाणीकपातीपूर्वी मुबलक पाणीसाठा करून ठेवावा जेणेकरून टंचाई निर्माण होणार नाही असे आवाहनही कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी केले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाने बारवी धरणातील पाणीकपाती बाबत सूचना वरिष्ठ कार्यालय व सर्व यंत्रणांना कळवली आहे.

यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता मुख्यालय अंधेरी, केडीएमसी आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त, अधीक्षक अभियंता तुंगाप्रि डोंबिवली, कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष, तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे, इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महानगरपालिका, शिरढोण नवी मुंबई तसेच उपअभियंता व तळोजा उपविभाग यांना पत्र पाठवण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news