Political News: महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी: एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.
Political News
Political NewsPudhari
Published on
Updated on

ठाणे: बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.

Political News
Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरून ठाकरे गटात मतभेद

ठाणे येथे पत्रकारांशी बोलताना नामदार शिंदे यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) बारामती पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत दिल्लीतील नेत्यांचीदेखील परवानगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बारामतीमधून काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

Political News
Bribe Case: खारघरमध्ये ACBची कारवाई! मंत्रालयातील अधिकाऱ्याला 6.37 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

एकीकडे काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीदेखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news