Badlapur Ovum Trafficking Case; बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात पाचवा आरोपी जेरबंद

अवैध इंजेक्शन्स व औषध पुरवठ्याचा आरोप; विठ्ठलवाडी–वांगणी परिसरात पोलिसांची छापेमारी सुरू
IVF
IVFPudhari
Published on
Updated on

बदलापूर : बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणी बदलापूर पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे. सुमित सोनकांबळे असं आरोपीचं नाव आहे. स्त्रीबीज प्रकरणी अवैधरित्या इंजेक्शन्स आणि इतर औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

IVF
Thane Municipal Corporation: ठाणे महापालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ; महायुतीतच सेना-भाजप संघर्षाची ठिणगी

स्त्रीबीज तस्करी प्रकरणात याआधी पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे आणि सोनल गरेवाल या चार महिला दलालांना अटक केली होती. त्यांच्या घरातून बेकायदेशीरपणे साठवण्यात आलेला इंजेक्शनचा आणि औषधांचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे. या संपूर्ण चौकशी दरम्यान पोलिसांनी ठाणे विठ्ठलवाडी,

IVF
Online Gaming Suicide Law Maharashtra: ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यात तरुणाई; ‘आत्महत्येला प्रवृत्त’ गुन्हा दाखल करण्याची मागणी

बदलापूर तसच वांगणी परिसरात छापेमारी करत आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप डॉक्टर, तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या हॉस्पिटल्स आणि आयव्हीएफ सेंटर व स्त्रीबीज विकत घेणाऱ्या बाबत कारवाई केल्याचा समोर आलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणात छोटे मासेच पोलिसांच्या हाताला लागत आहे. या प्रकरणात आणखी ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कारवाईचा फास कधी आवळला जाणार, असा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news