Egg donation scam : बदलापूर स्त्री बीज विक्रीचे ठाण्यात कनेक्शन

शहरातील आयव्हीएफ आणि सोनोग्राफी सेंटर महापालिकेच्या रडारवर...
Egg donation scam
Egg donation scampudhari photo
Published on
Updated on

ठाणे : बदलापूरमधील स्त्रीबीज विक्रीचे कनेक्शन ठाण्यात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या ठाण्यातील एका आयव्हीएफ सेंटरवर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली असून त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शहरातील सर्वच आयव्हीएफ सेंटर आणि सोनोग्राफी सेंटर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या रडारवर आले असून या सर्वच सेंटरची कसून तपासणी केली जात आहे.

नाशिकमध्ये मालती आयव्हीएफ केंद्राला परवानगी देण्यात आली असताना हे सेंटर ठाण्यात अवैधरित्या सुरू होते. त्याची कोणतीही नोंदणी ठाणे महापालिकेकडे करण्यात आली नव्हती. याच केंद्रात स्त्री बीज विक्रीचा प्रकार बेकायदा सुरू होता.

Egg donation scam
Mumbai Crime : अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करून प्रेयसीची बदनामी

बदलापूर पोलिसांच्या कारवाईतून ही माहिती उघड होताच या केंद्रावर पोलीस आणि ठाणे पालिका आरोग्य विभागाने संयुक्त धाड टाकून कारवाई केली. तसेच ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारवाईनंतर हे केंद्र आता बंद करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात असे प्रकार सुरू आहेत की नाही, याची कसून तपासणी आता पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. ठाणे शहरातील 11 आयव्हीएफ तसेच 259 सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्याबरोबरच अवैध केंद्रांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम पालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.

Egg donation scam
Snake found in water jar : सीलबंद पाण्याच्या जारमध्ये आढळला साप

एखाद्या आयव्हीएफ सेंटरमध्ये किंवा सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचे आढळल्यास या सेंटरवर कारवाई करून ते तत्काळ बंद करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून सहा विशेष पथके...

या प्रकरणानंतर आरोग्य विभागाकडून सहा विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती या पथकांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोनोग्राफी सेंटरचीही तपासणी करण्यात येणार आहे.

“बदलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता शहरातील सर्वच आयव्हीएफ सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत काही सेंटरची पाहणी करण्यात आली असून या सेंटरमध्ये अद्याप बेकायदेशीरपणे काम होत असल्याचे आढळलेले नाही. नागरिकांकडे काही माहिती असल्यास त्यांनी आरोग्य विभागाला माहिती द्यावी.”

डॉ. प्रसाद पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news