Badlapur Doctor Arrested: बदलापूरच्या डॉक्टरला ATS कडून अटक, सोशल मीडियाद्वारे करत होता तरुणांचा ब्रेन वॉश
Badlapur Doctor Arrested SIMI Connection
बदलापूर : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या एका दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून बदलापूर शहरातून एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर ओसामा शेखला उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली आहे.
तो बदलापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होता. केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेला ओसामा ऑनलाईन मार्गदर्शन करत होता, असे उत्तर प्रदेश एटीएसकडून सांगण्यात आले.
बदलापूर शहरात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली असून अटक ओसामा हा कधीपासून बदलापूर शहरात राहत होता, त्याला कोण मदत करत होते याचा तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.
ओसामा शेख हा बदलापूर पूर्वेच्या एका हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून काम करत होता. त्याच्या सिमी कनेक्शनमुळे उत्तर प्रदेश एटीएस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याला बदलापूरमधून अटक केल्यानंतर बदलापुरातून एका डॉक्टरला एटीएसने घेतले ताब्यात उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले.
त्याला 8 ऑगस्टपर्यंत ट्रान्झिट रिमांड देण्यात आल्याचे बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले. ट्रान्झिट रिमांड घेऊन उत्तर प्रदेश एटीएसचे पथक आरोपीला घेवून रवाना झाले.
तरुणांचा करत होता ब्रेन वॉश
ओसामा शेख हा अरमान अली नावाच्या एका दहशतवादी संघटनेशी संबंधीत व्यक्तीच्या संपर्कात होता. ओसामा शेख याने काही मुस्लिम मुले अरमानच्या संपर्कात आणली होती, असाही संशय उत्तर प्रदेश एटीएसला आहे. मुलांचे ब्रेन वॅाश करणं, त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटनांच्या संपर्कात आणण्याचे काम ओसामा शेख याने केल्याचा संशय उत्तर प्रदेश एटीएसला आहे.

