Maharashtra Politics | पक्षांतराचा राग की वैयक्तिक वाद? निवडणूक निकालानंतर बदलापुरात तणाव; भाजप पदाधिकाऱ्याच्या कारची तोडफोड

Maharashtra Politics | पोलिस तपास सुरू; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध
Nanded News
Nanded Newspudhari photo
Published on
Updated on
Summary
  • बदलापूर पश्चिमेतील बॅरेज रोड परिसरात घटना

  • भाजप पदाधिकारी राजेश परदेसी यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड

  • जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

  • बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • आरोपी म्हणून सचिन खंडागळे उर्फ टकल्या याचे नाव

  • आरोपी पसार; शोधमोहीम सुरू

कुळगाव–बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या एका दिवसात बदलापुरात राजकीय तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर पश्चिमेतील बॅरेज रोड परिसरात भाजपाचे पदाधिकारी राजेश परदेसी यांच्या चारचाकी वाहनाची मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेसोबतच परदेसी यांना जीवे मारण्याची उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded News
Thane News | ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक पाऊल : डोंबिवलीत DFCCL प्रकल्पाची टेस्ट राईड यशस्वी, मालवाहतूक व्यवस्थेत होणार क्रांती

राजेश परदेसी हे भाजपामध्ये सक्रिय पदाधिकारी असून नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी शिवसेना शिंदे गटातून भाजपामध्ये प्रवेश केला होता. निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने परदेसी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची काच फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर परदेसी यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणात सचिन खंडागळे उर्फ टकल्या याने वाहनाची तोडफोड करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाकडून या घटनेमागे पक्षांतराचा राग असल्याचा दावा करण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या पक्षांतरामुळे वैयक्तिक व राजकीय वाद निर्माण झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी कारणे स्पष्ट होतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Nanded News
Thane Politics : कल्याण-डोंबिवलीत भाजपाचा स्वबळाचा नारा?

घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनाची पाहणी करून पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन खंडागळे याचा गुन्हेगारी इतिहास असून यापूर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते. सद्यस्थितीत आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

या घटनेनंतर बॅरेज रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिस बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे

दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पालिका निवडणुकीनंतर राजकीय मतभेद उफाळून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजेश परदेसी यांनी पोलिस प्रशासनाकडे आपली आणि कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात भादंवि अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बदलापूर पोलिसांकडून सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news