

Atul Mone death
कल्याण : काश्मीरमध्ये पर्यटनासाठी अतुल मोने आपल्या कुटुंबीयांसह गेले असता पेहलगाम येथे दहशतवादी आतंकवाद्यांनी केलेल्या बेछुटपणे केलेल्या गोळीबारात अतुल मोने,संजय लेले व हेमंत जोशी या तिघा डोंबिवलीकर पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
बुधवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास काश्मीर श्रीनगर हून अतुल मोने यांचा पार्थिव देह डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील श्रीराम अचल इमारतीतील राहत्या घरी आणण्यात आला. अतुल मोने यांचा मृत देह पाहताच त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांनी आक्रोश करीत हंबरडा देत टाहो फोडला. अतुल मोने यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती.
अतुल मोने यांची पत्नी व मुलगी या दोघांनाही वेगळ्या गाडी तून आणण्यात आले होते. त्याची पत्नी व मुलगी यांनी अतुल यांचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडल्याने जमलेल्या नागरिकांनाही आपले अश्रू अनावर झाले. जमलेल्या नागरिकांनी या घटनेचा निषेध करीत पाकिस्तान मुर्दाबाद ,दहशतवादी अतिरेक्यांना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. घरातून मोने यांचा मृतदेह भागशाला मैदानात दर्शनासाठी ठेवण्यात आला.