

Former MLC Ashok Modak
ठाणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच कोकण पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. त्यांनी १०४ शोध निबंध आणि ४० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.
डोंबिवलीकर असलेले डॉ. मोडक हे काही वर्षांपासून मुंबईतील पवई येथे राहत होते. त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २ जानेवारीला रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज पवईतील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजप, अभाविप, शिक्षणक्षेत्र, साहित्य क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी श्रद्धांजली वाहिली.
अशोक मोडक यांचा जन्म १९४० मध्ये झाला होता. त्यांनी एम ए इकोनॉमिक्स आणि एम ए पॉलिटिकल सायन्स केले आणि जेएनयूमध्ये पीएच डी केली. सोवियत इकॉनॉमिक एड टू इंडिया या विषयामध्ये संशोधन केले. तेव्हापासून ते सोवियत रशियाचे आर्थिक और राजकीय विषयों के तज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले.
१९६३ से १९९४ दरम्यान प्राध्यापक म्हणून काम केले. २०१५ मध्ये भारत सरकारने त्यांना राष्ट्रीय रिसर्च प्रोफेसर म्हणून पाच वर्षासाठी नियुक्त केले होते. मोडक यांनी १०४ शोध निबंध आणि ४० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. देश आणि विदेशातील अनेक विश्वविद्यालयात व्याख्यान दिले आहेत. त्यांच्यावर अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले होते.
त्यांनी गुरु घासीदास केंद्रिय विश्वविद्यालयाचे , बिलासपुर, छत्तिसगढ कुलाधिपती म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढविली आणि विधान परिषदेमध्ये प्रभावीपणे काम केले. त्यांनी स्वतःहून दुसऱ्यांदा निवडणूक लढविली नाही आणि दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली होती. आमदार असताना ते बसने कोकणात प्रवास करीत असत. दोन दिवसांपूर्वीच त्यांना चतुरंग प्रतिष्ठानतर्फे सन्मानित करण्यात आले होते.