

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मंगळवारी (दि.17) रोजी लोकसभेमध्ये भाषणादरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात केलेल्या विधानावरुन मोठ्या वाद सुरु झाला आहे. काँग्रेसवर निशाणा साधताना अमित शाहांनी भाषणाच्या सुरुवातीला केलेल्या विधानाला विरोधकांनी विरोध दर्शवला आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत अमित शाहांवर निशाणा साधला आहे, "बाबासाहेबांचा असा अपमान केवळ आणि केवळ तीच व्यक्ती करु शकते जिच्या मनात बाबासाहेबांच्या संविधनाबद्दल द्वेष आहे. ज्यांच्या पुर्वजांनी शोषित आणि वंचितांसाठी दूत असलेल्या बाबासाहेबांचे पुतळे जाळले तेच असं बोलू शकतात. या संघाच्या लोकांना बाबाबासाहेबांच्या नावाचा एवढा त्रास का होतो? त्यांना या नावाबद्दल इतकी घ्रृणा का आहे?" असा सवाल श्रीनेत यांनी उपस्थित केला आहे.
आम्हाला स्वर्ग काय असतो हे काय माहीत नाही पण त्या महामानवानीच आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढले.मानवी जीवनाची ओळख त्यांनी करून दिली त्या मुळे त्यांचे नाव फैशन म्हणून घेतले जात नाही तर त्यांच्या उपकाराची जाणीव ठेऊन घेतले जाते. देवाचे नाव घ्यायचा अधिकार कुठे होता आम्हाला .तीन टक्के लोकांनी देवाला कुलूप लावून बंद करून ठेवले होते अगदी स्पष्ट जे दिले ते भीमानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच, आज मागासवर्गीय समाजातील लोकांना पंतप्रधान होता आलं, आदिवासी समाजातील व्यक्तींना राष्ट्रपती होता आलं, माझ्या सारख्या भारतातील तमाम SC, ST, OBC, समाजातील लोकांना मंत्री, खासदार, आमदार होता आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच या भारतातील तमाम नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल झाले. माणसाला माणूस म्हणून जगता आलं. त्यांच्या संविधानामुळेच या भारताची अखंडता टिकून राहिली, त्यांच्या संविधानामुळेच या देशाला समता-न्याय-बंधुत्वांची शिकवण मिळाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला "देवापेक्षा" कमी नाहीत..!
डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार, ठाणे