Ambivali Pradeep Ringasia Attack: शहाडमध्ये अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; कुटुंबासह संपवण्याची धमकी!

चेंबूरहून धमकीचा फोन; तपास सुरू
Ambivali  Pradeep Ringasia Attack
Ambivali Pradeep Ringasia AttackPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: आंबिवली येथील बाळकृष्ण पेपर मीलमध्ये सहाय्यक प्रमुख म्हणून कार्यरत असलेले 66 वर्षीय ज्येष्ठ अधिकारी प्रदीप रिंगासिया यांच्यावर शहाड परिसरात तिघा सशस्त्र हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारवर लोखंडी सळ्यांनी हल्ला केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना चेंबूरमधून फोन करून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप रिंगासिया हे गेल्या आठवड्यात संध्याकाळी बाळकृष्ण पेपर मीलमधून कारने घरी जात होते. त्यांच्यासोबत स्वयंपाकी प्रकाश पुरोहित होते. शहाड परिसरातील हॅप्पी होम सोसायटीजवळ पोहोचताच तिघे जण अचानक कारसमोर आले. त्यांच्या हातात लोखंडी सळ्या होत्या.

Ambivali  Pradeep Ringasia Attack
Teacher Recruitment: दोन महिने उलटले; सुधारित याद्यांचा पत्ता नाही! शिक्षक भरतीतील उमेदवारांचा संताप

हल्लेखोरांनी कारच्या दर्शनी भागासह दरवाजांच्या काचा फोडल्या. प्रसंगावधान राखत त्यांनी कार वेगाने पुढे दामटली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी रात्री रिंगासिया यांच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला.

“मी चेंबूरमधून गणेश शिंदे बोलतोय. पुन्हा कंपनीत दिसलास तर तुला आणि बोईसरमध्ये राहणाऱ्या तुझ्या कुटुंबालाही संपवू”, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Ambivali  Pradeep Ringasia Attack
SSA Uniform Logo: गणवेशावर ‌‘समग्र शिक्षा‌’ लोगोची सक्ती; शाळा व्यवस्थापन समित्यांमध्ये संभ्रम

पोलिसांच्या प्राथमिक तपासात धमकी देणारा संशयित चेंबूरच्या गौतमनगर परिसरातील मयूर उर्फ गणेश शिंदे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघा अज्ञात हल्लेखोरांसह धमकी देणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आंबिवली परिसरातील औद्योगिक क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news