Thane Crime: अंबरनाथमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा चाकूहल्ला

गुन्ह्यातील हेमंत गुमाणे हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Thane Crime
Thane Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

अंबरनाथ : एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे. या गुन्ह्यातील हेमंत गुमाणे हा आरोपी मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पश्चिम भागातील हाऊसिंग बोर्ड परिसरात असलेल्या गुरुद्वारासमोर शुक्रवारी सायंकाळी गुन्ह्यात जखमी झालेली तरुणी कामावरून घरी येत असताना आरोपी हेमंत गुमाणे याने तिला गुरुद्वारासमोर गाठून तिच्यावर चाकूने हल्ला केला.

Thane Crime
Raigad News : कंटेनरवरील शंभर टनाची लोखंडी प्लेट निसटली; कळंबोलीत वाहतुकीचा बोजवारा

या हल्ल्यात विशाखाच्या पोटावर, हातावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हल्ल्यानंतर आरोपी हेमंत गुमाणे फरार झाला असून त्याच्या शोधासाठी अंबरनाथ पोलिसांनी चार पथकं रवाना केली आहेत. तर गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास सुरू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.

Thane Crime
Bhiwandi Accident : ट्रकच्या धडकेत वृद्धाचा चिरडून मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.