Ambernath MIDC: अंबरनाथ एमआयडीसीतील 1400 कंपन्या परराज्यात जाणार? गुंडगिरी, दलालांमुळे उद्योजक हवालदिल

Ambernath Manufacturers Association:दलालांचा त्रास आणि दादागिरीमुळे उद्योजक हवालदिल, आमा संघटना
MIDC
MIDCPudhari
Published on
Updated on

Ambernath MIDC Issues

अंबरनाथ : आनंद नगर एमआयडीसी मधील कारखानदारांना आवश्यक सुविधा मिळवण्यासाठी झगडावे लागते. इतकेच नाही तर स्थानिक दलालांमुळे जागेचे भाव वाढून, बांधकामासाठी लागणारे साहित्य देखील माथी मारण्यासाठी दादागिरी व दहशत पसरवली जात असल्याने येथील कारखानदार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे येथील बहुतांश कंपन्या गुजरात व तेलंगणा येथे स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेत असल्याचा इशारा अंबरनाथ डिशनल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात आमा संघटनेने दिला आहे.

MIDC
Ambarnath municipal chaos : अंबरनाथ नगरपालिका बनले फ्रिस्टाईलचा आखाडा

सोमवारी आमा संघटनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली. अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीत साधारण 1400 हून जास्त कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून 50 ते 60 हजार कोटी रुपयांची उलाढाल वर्षाकाठी होत असतानाही येथील कंपन्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यात राज्य शासन उदासीन असल्याने कारखानदार हवालदिल झाले आहेत.या अवस्थेची कामगार मंत्री व राज्य सरकार यामध्ये कोणतीही दखल घेत नसल्याने कारखानदार नाराजी व्यक्त करत आहेत.

Ambernath industrial area
अंबरनाथ : आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे पत्रकार परिषदेत व्यथा मांडताना.pudhari photo

सुविधांचा अभाव व दलालांचा प्रचंड त्रास यामुळे याआधी काही मोठ्या कंपन्या गुजरात व तेलंगणा येथे स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे 8 ते 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक परराज्यात गेली असल्याचे आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news