Ambarnath theatre inauguration : अंबरनाथच्या नाट्यगृहाचा पडदा उघडणार

19 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री शिंदे, अशोक सराफ यांच्या उपस्थितीत लोकार्पण,सिनेअभिनेत्यांची उपस्थिती; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाट्यगृहास मोलाचे योगदान
Ambarnath theatre inauguration
अंबरनाथच्या नाट्यगृहाचा पडदा उघडणार pudhari photo
Published on
Updated on

अंबरनाथ : खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या भव्य अंबरनाथ नाट्यगृहाचे लोकार्पण रविवार, 19 ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मराठी कलाविश्वातील नामवंत दिग्दर्शक, अभिनेते व संगीतकार अंबरनाथ नगरीत उपस्थित राहणार आहेत. अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदान येथे उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहाच्या लोकार्पणानिमित्त 8 दिवस सुप्रसिद्ध नाटकांच्या विशेष प्रयोगांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तर नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या ‌‘सही रे सही‌’ या लोकप्रिय नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

Ambarnath theatre inauguration
Mumbai-Ahmedabad Highway Traffic Jam | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 9 तास वाहने स्तब्ध

या लोकार्पण सोहळ्याला मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे, महेश मांजरेकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेते विजय गोखले, अभिनेत्री अलका कुबल, अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर, अभिनेते मकरंद अनासपुरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, संतोष जुवेकर आदी लोकप्रिय कलाकारही या सोहळ्याची शोभा वाढवतील. मराठी संस्कृती, नाट्यकला, संगीत क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने अंबरनाथचा हा लोकार्पण सोहळा एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शहरात आधीच रस्त्यांचे काँक्रीटीकरण, ग्रंथालये, अभ्यासिका, उद्याने आणि पायाभूत सुविधा उभारल्यानंतर आता या नाट्यगृहाच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रातही नवा अध्याय सुरू झाला आहे. या नाट्यगृहामुळे अंबरनाथ आणि परिसरातील रसिकांना कल्याण किंवा डोंबिवली गाठण्याची गरज आता उरणार नाही. अंबरनाथ शहरातच विविध नाटकांची अनुभूती नागरिकांना घेता येणार आहे. अंबरनाथचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला नाट्य, संगीत, कला यांचा अनुभव देण्यासाठी हे नाट्यगृह निश्चितच एक महत्वाची वास्तू ठरणार आहे.

Ambarnath theatre inauguration
Diwali 2025 : धारावी कुंभारवाड्यात फॅशनेबल पणत्या

असे आहे नाट्यगृह...

नाट्यगृहात अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, आकर्षक आणि प्रशस्त रंगमंच, सुमारे 658 प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था असलेले हे नाट्यगृह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरातील एक अभिमानास्पद सांस्कृतिक वास्तू ठरणार आहे. तसेच यात दोन छोटे सभागृह, प्रदर्शन कक्ष, कार्यशाळा सभागृह, ग्रीन रूम, क्राय रूम, उपहारगृह आणि भव्य पार्किंगची सुविधा असल्याने हे नाट्यगृह सर्वार्थाने बहुउद्देशीय ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news