Ambarnath Hydrocarbon Seizure: अंबरनाथमध्ये 1.20 कोटींचा संशयित हायड्रोकार्बन साठा जप्त! राज्य दक्षता पथकाची धडक कारवाई

१.२० कोटींचा मुद्देमाल हस्तगत; अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची कारवाई
Ambarnath Hydrocarbon Seizure
Ambarnath Hydrocarbon SeizurePudhari
Published on
Updated on

नेवाळी: अंबरनाथ तालुक्यातील खोणी-तळोजा महामार्गालगत असलेल्या उसाटणे गावाजवळ अवैधरित्या साठवणूक केलेल्या हायड्रोकार्बन पेट्रोलियम पदार्थांच्या साठ्यावर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने धडक कारवाई करत तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इंधन भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या या संशयित साठ्यावर झालेल्या कारवाईमुळे अवैध इंधन व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

राज्य दक्षता पथकाचे अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य दक्षता पथकाने प्लॉट नंबर २० च्या समोर, न्युओ लॉजिस्टिक पार्क, उसाटणे, अंबरनाथ, ठाणे येथे धाड टाकण्यात आली. सदर ठिकाणी टॅंकरचे सिल तोडून हायड्रोकार्ब़न पेट्रोलियम पदार्थांची अवैध साठवणूक व विक्री करताना दोन व्यक्ती आढळून आल्या.

Ambarnath Hydrocarbon Seizure
Dry Fruits Price Hike: मुंबईत सुकामेवा महागला; बदाम, पिस्ता, मनुकाच्या दरात दोनशे रुपयांची वाढ

हायड्रोकार्बन पेट्रोलियम पदार्थांनी भरलेले टॅंकर २९७०० किलो भरलेला साठा आढळून आला. तसेच उभ्या असलेल्या टॅंकरमध्ये अवैध साठा करत होते या टेम्पोमधील २०० लिटरच्या प्लॅस्टीक बॅरेलमध्ये मध्ये मोटारीच्या सहाय्याने हायड्रोकार्बन ऑईल अवैधरित्या साठवणूक करत असल्याचे आढळून आले. यामध्ये २२० लिटर क्षमतेचे २० रिकामे प्लॅस्टिक बॅरेल मध्ये आढळले तर जमीनीवर ८० रिकामे बॅरल, १ इलेक्ट्रीक मोटार, एक पम्प असा अंदाजे १ कोटी २० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईदरम्यान पेट्रोलियम पदार्थांसह साठवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या टाक्या, कंटेनर, वाहतूक व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हा पदार्थ इंधनामध्ये भेसळ करण्यासाठी वापरला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व साहित्याची एकत्रित किंमत सुमारे १ कोटी २० लाख रुपये असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

Ambarnath Hydrocarbon Seizure
Mumbai Hawker: फेरीवाला ओळखपत्र हा परवाना नाही, झोन करेपर्यंत कारवाई होणारच; मुंबई पालिकेची भूमिका

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली असून संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित साठा नेमका कुठून आणला गेला, त्याचा पुरवठा कोणाला केला जात होता आणि या अवैध व्यवहारामागे कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी संबंधित

साठवणूकदार आणि अन्य संशयितांविरोधात उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राज्य दक्षता पथकातील

उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदिप काळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे योगेश जंगले, मुख्य निरीक्षण अधिकारी, नागनाथ हंगरगे, शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, रवींद्र राठोड, राजेश सोरते, देवानंद थोरवे, पवन कुंभले, राहुल इंगळे, अरुण काते यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news