Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर 'एसटी' ला परवानगी द्या

'एसटी'ला 'समृद्धी'वर परवानगी देत नाही तोपर्यंत राज्यात समृद्धी येणार नाही, समाजवादीचे आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
Samruddhi Highway
Samruddhi HighwayFile Photo
Published on
Updated on

Allow 'ST' on Samruddhi Highway

अंबाडी : पुढारी वृत्तसेवा

'मुंबई ते नागपूर' या ७०१ किमीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा कर 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसना चावण्यास संमती द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे 'भिवंडी पूर्व'चे आमदार रईस शेख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व 'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा'चे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार शेख यांनी पत्राव्दारे मागणी केली आहे.

Samruddhi Highway
Thane News : घोडबंदर गावात बनावट नोटा छापण्याचा कारखाना

रईस शेख म्हणाले की, 'समृद्धी' महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उ‌द्घाटन झाले. आता ७०१ किमी 'समृद्धी' महामार्ग वाहतुकीस पूर्ण खुला आहे. १० जिल्हे, २६ तालुके, २९ शहरे आणि ३९२ गावांना जोडणारा हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महामार्ग होणार आहे. मात्र या महामार्गावरुन 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा'च्या बसेसना चावण्यास परवानगी नाही.

शेख पुढे म्हणाले की, 'समृद्धी' महामार्ग सार्वजनिक निधीतून बनलेला आहे. तो सामान्य नागरिकांना वापरता आला पाहिजे. 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ' सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे. या बसेसना 'समृद्धी' वर धावण्यास संमती दिली जात नाही, तोपर्यंत हा मार्ग श्रीमंतांची चैन असणार आहे. अन्यथा सामान्यांना हा प्रवास परवडणारा नाही, असा दावा आमदार रईस शेख यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news