Thane Kalyan Dombivli Connectivity : ठाणे-डोंबिवलीला मिळणार जलद मार्ग

ऐरोली-काटई कॉरिडॉरमुळे पंचेचाळीस मिनिटे वाचणार
Thane Kalyan Dombivli Connectivity
Thane Kalyan Dombivli Connectivitypudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंब्रा : ठाणे-कल्याण-डोंबिवली ही महानगरे जोडण्‍यासाठी ऐरोली-काटई नाका कॉरिडॉर हा जलद मार्ग तयार केला जात आहे. यामुळे या शहरांमधून प्रवास करण्‍यासाठी सध्‍या लागणाऱ्या वेळेत ४५ मिनिटांची बचत होणार आहे. प्रवासाचे अंतर २० किलोमीटरवरून ७ किलोमीटर कमी होणार आहे. त्यामुळे एकूण प्रवास हा दहा मिनिटात होऊ शकणार आहे. या जलद प्रवासामुळे दोन्ही शहरांमधील ये-जा अधिक सोपी होणार आहे.

ऐरोली-काटई नाका कॉरिडॉरमुळे नवी मुंबईकडून ठाणे ते कल्याण डोंबिवली प्रवासाचे अंतर ७ ते ८ किमीने कमी होणार असून प्रवासासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असल्याने वाहनचालकाची वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार आहे. ज्यामुळे वाहनचालकाचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.

Thane Kalyan Dombivli Connectivity
Madgaon Express Delay : मडगाव एक्‍स्‍प्रेसची सतत रखडपट्टी

या पुलाच्या दोन मार्गिकांचे काम अंतिम टप्प्यात असून बुधवारी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या पुलाची पाहणी केली. लवकरच या दोन्ही मार्गिका सुरू केल्या जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. हा प्रकल्प मंजूर करण्यासह त्याला गती देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

ऐरोली-काटई उन्नत मार्ग हा एमएमआरडीए क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जातो. सुमारे १२.७१ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे ऐरोली ते डोंबिवली दरम्यानचे अंतर सुमारे १० किलोमीटरने कमी होणार असून, प्रवासासाठी लागणारा ३० ते ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई ते डोंबिवली हे अंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.

Thane Kalyan Dombivli Connectivity
Maharashtra Weather Update : राज्यात आठवडाभर थंडी कमीच राहणार

या प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग-४ या ३.४३ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड या २.५७ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही टप्प्यांचे उद्घाटन करून ते एकाचवेळी वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. या दोन्ही टप्प्यांमुळे महापे, शिळफाटा, कल्याण फाटा तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक जलद होणार आहे.

मुलुंड-ऐरोली पूल, ठाणे-बेलापूर मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग-४ यांच्यात अखंड व जलद संपर्क निर्माण होणार असल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा वेळ, इंधन आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीलाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे.

लाखो नागरिकांना मोठा दिलासा

टप्पा क्रमांक १ आणि २ ज्यात उन्नत मार्ग आणि १.६९ किमी लांबीचा बोगदा समाविष्ट आहे ते वाहतुकीसाठी एकत्रितपणे खुले करण्यासाठी सज्ज असून हे टप्पे ऐरोलीला मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग-०४ ला जोडतील. ज्यामुळे ऐरोली शहर, ठाणे बेलापूर रोड, महापे शिळफाटा आणि कल्याण फाटा मार्गे प्रवास करण्यासाठी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. हा मार्ग सुरू झाल्यानंतर लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक सक्षम आणि वेगवान करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग-४ ते काटई नाका या ६.७१ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू झाले असून हा टप्पा येत्या एक ते दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण १२.७१ किलोमीटरचा ऐरोली-काटई उन्नत मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. त्यानंतर नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील वाहतूक अधिक गतिमान होणार असून नवी मुंबई ते डोंबिवली हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात पहिला आणि दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आता या दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण होत असताना आयुक्त मुखर्जी यांनी या मार्गाची पाहणी करत उर्वरित कामे दर्जेदार आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.