Achyut Potdar passes away
ठाणे: ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी रात्री ठाण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. १९) अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पोतदार यांनी सुमारे १२५ हुन अधिक चित्रपटांमध्ये तसेच दूरदर्शन मालिका, नाटके आणि जाहिरातींमध्ये स्त्रिची भूमिका साकारली होती.
मध्यप्रदेशातील जबलपूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण इंदूर येथे गेले. १९६१ मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर काही काळ त्यांनी मध्यप्रदेशातील रिवा येथे प्राध्यापक म्हणून काम केले, त्यानंतर भारतीय लष्करात दाखल होऊन १९६७ मध्ये कॅप्टन पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते इंडियन ऑईलमध्ये कार्यकारी पदावर कार्यरत होते. १९९२ मध्ये ५८व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. नोकरीदरम्यान ते सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यप्रयोगांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असत. अभिनय हा त्यांचा छंद होता, त्यांच्या अभिनयामुळे हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत भूमिका मिळत गेल्या. विधु विनोद चोप्रा यांच्या चित्रपटांमधील कायमस्वरूपी कलाकार मानले जात. थ्री इडियट्स, फेरारी की सवारी, दबंग २, लगे रहो मुन्ना भाई, परिणीता, हम साथ साथ हैं, वास्तव, रंगीला, ये दिल्लगी, तेजाब, अर्ध सत्य आणि परिंदा यांचा समावेश होतो.
भारत एक खोज, प्रधानमंत्री, शुभ मंगल सावधान, आंदोलन, अमिता का अमित, मिसेस तेंडुलकर, आहट, अगले जनम मोहे बिटिया ही किजो, माझा होशील ना आणि वागळे की दुनिया या मालिकांमध्ये त्यांचे भूमिका रसिकांच्या कायम लक्षात राहतील. झी गौरव आणि इंदुर येथील संस्थेच्या पुरस्काराचे ते मानकरी होते.