Accident | शहापूर जवळ पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात ; 3 ठार, 14 जखमी

जखमींना रुग्णालयात हलवलं, उपचार सुरु
Accident
शहापूर जवळ 5 वाहनांचा विचित्र अपघात Pudhari
Published on
Updated on
कसारा : शाम धुमाळ

मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर गोठेघर नजिक झालेल्या विचित्र अपघातात 3 जण ठार झालेत तर 14 जण जखमी झाले.

आज पहाटे 3.50 च्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या एका कंटेनर वरील चालकाचा गाडी वरील ताबा सुटला व कंटेनर ने समोर असलेल्या 3 वाहनासह दुसऱ्या मार्गिकेवरील एका बस ला धडक दिली. या विचित्र अपघातात 3 बस प्रवासी मयत झाले असून त्यात 2 महिला व 1 पुरुष यांचा समावेश आहे. 14 जण जखमी झाले असून त्या पैकी 8 जण ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर 6 जण शहापूर येथे उपचार घेत आहेत.

दरम्यान जखमी ट्रक, टेम्पो,बस मधील असून अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे , महामार्ग पोलीस केंद्र च्या छाया कांबळे, शहापूर महामार्ग पोलीस, शहापूर पोलीस,आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरु करीत जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असून महामार्गांवरील आपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचं काम सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news