ठाणे : कर्जबाजारी तरूणाने पैशासाठी केला शेजाऱ्याचा खून

ठाणे : कर्जबाजारी तरूणाने पैशासाठी केला शेजाऱ्याचा खून

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन क्रिकेटच्या बेटिंगमुळे कर्जबाजारी झालेल्या तरूणाने शेजारी राहणाऱ्या वृद्ध महिलेचा खून केला. त्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून पळून गेला. ही घटना गुरूवारी (दि.१३) पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालय परिसरात घडली. आशा अरविंद रायकर (६२, रा. वसंत निवास, पहिला माळा, गोल्डन नेक्स्ट सोसायटीच्या मागे, शास्त्रीनगर, डोंबिवली-पश्चिम) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी त्यांची मुलगी दीपा दिगंबर मोरे (वय ४५) यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कोणताही धागा-दोरा हाती नसताना पोलिसांनी अवघ्या सहा तासात या गुन्हाचा तपास करत संशयित आरोपीला अटक केली. यश सतीश विचारे (वय २८, रा. वसंत निवास, तिसरा मजला, शास्त्रीनगर) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून तो आणि आशा रायकर हे दोघे एकाच इमारतीत राहत होते.

आशा रायकर राहत असलेल्या वसंत निवास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या खूनाचा उलगडा करणे, पोलिसांंसमोर मोठे आव्हान होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी या वृद्धेच्या खून प्रकरणी तपास पथके तयार करून तपास चक्रांना वेग दिला. आशा रायकर घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या गळ्यात सोन्याची माळ आणि कर्णफुले होती. खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज गायब होता. त्यानंतर चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
हा खून यश विचारे यांने केल्याची माहिती पोलिसांना पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचीन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक दीपविजय भवर आणि त्यांच्या पथकाने वसंत निवासमध्ये राहणाऱ्या यश विचारे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने वृद्धेचा खून केल्याची कबुली दिली. आपण कर्जबाजारी आहोत. हे कर्ज फेडण्यासाठी आपण आशा रायकर यांच्या अंंगावरील दागिने चोरल्याचीही माहिती त्याने दिली.

लोटस 365 ऍपमुळे कर्जबाजारी

यश याला मोबाईलमध्ये बेटिंग लोटस ऍपवर क्रिकेटचा ऑनलाईन जुगार खेळण्याचे व्यसन आहे. या जुगाराच्या माध्यमातून यशवर ६० हजार रूपयांचे कर्ज झाले होते. कर्ज देणाऱ्यांनी यशमागे तगादा लावला होता. जवळ पैसे नसल्याने यशने शक्कल लढून आपल्याच इमारतीमधील आशा रायकर यांचा खून करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून त्या माध्यमातून पैसे उभे करण्याचे ठरविले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news