Kalyan Lok Sabha Election : कल्याण लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंच भूमिपुत्र कार्ड?; संतोष केणे यांना विचारणा  | पुढारी

Kalyan Lok Sabha Election : कल्याण लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंच भूमिपुत्र कार्ड?; संतोष केणे यांना विचारणा 

नेवाळी :पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उमेदवार महाविकास आघाडीकडे नसल्याने शिंदे हे हॅटट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरेंकडून त्यांच्याविरोधात स्थानिक भूमिपुत्र देण्याचा विचार सुरू केला आहे. यासाठी ठाकरेंनी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भूमीपुत्रांचे नेते संतोष केणे यांना उमेदवारीबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे यंदा लोकसभेसाठी भूमिपुत्र चेहरा  मिळू शकतो.  Kalyan Lok Sabha Election
कल्याण लोकसभा मतदारसंघात आगरी मतदार सर्वाधिक आहेत. मुंब्रापासून ते श्री मलंगगड परिसरात आगरी स्थानिक मतदार सर्वाधिक आहेत.  मागील लोकसभा निवडणुकीत आगरी कार्ड राष्ट्रवादी काँग्रेसने पुढे केले होते. मात्र उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचला नसताना देखील स्थानिक भूमीपुत्रांनी मताधिक्य दिले होते. आता शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर कल्याण लोकसभेत शिंदेच्याविरोधात ठाकरेंना उमेदवार सापडेनासा झाला आहे. त्यामुळे आता स्थानिक भूमिपुत्र संघटनांनामध्ये, वारकरी संप्रदाय, भूमीपुत्रांची आंदोलन यामध्ये सक्रिय असणारे काँग्रेसचे नेते संतोष केणे यांना उद्धव ठाकरे यांनी विचारणा केली आहे. Kalyan Lok Sabha Election
त्यामुळे या लोकसभेतील स्थानिक भूमिपुत्र चेहरा दिल्यास १४ गाव विकास समिती, २७ गाव संघर्ष समिती यांसह सर्व भूमीपुत्रांच्या संघटनांच्या पाठिंब्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. केणे यांनी उमेदवारीबाबत विचारणा झाली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  केणे यांचे लोकसभेसाठी नाव समोर आल्याने भुमिपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा 

Back to top button